ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय, मिशेल मार्शच्या धुवांधार १७७ धावा - विश्वचषकाचा 43 वा सामना

Cricket World Cup 2023 : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियानं बांग्लादेश संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. बांग्लादेशनं दिलेलं ३०७ धावांचं लक्ष्य त्यांनी ४४.४ षटकात फक्त २ गडी गमावून गाठलं. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शनं १३२ चेंडूत १७ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीनं १७७ धावा ठोकल्या.

Cricket World Cup 2023 BAN vs AUS
Cricket World Cup 2023 BAN vs AUS
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 11:27 AM IST

Updated : Nov 11, 2023, 6:39 PM IST

पुणे Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ४३ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बांग्लादेश संघाचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशनं निर्धारित ५० षटकात ३०६-८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं हे लक्ष्य अवघ्या ४४.४ षटकात फक्त २ गडी गमावून गाठलं.

ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित : ऑस्ट्रेलियन संघानं वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करुन उपांत्य फेरीतील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. तर बांग्लादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. मात्र तरीही बांग्लादेश विश्वचषकाचा समारोप विजयानं करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीपूर्वी आपल्या तयारीची चाचपणी करायची आहे. त्यामुळे या सामन्यासाठी त्यांनी मागच्या मॅचचा हीरो ग्लेन मॅक्सवेलला विश्रांती दिलीये.

शाकिब अल हसन खेळणार नाही : बांग्लादेशचा नियमित कर्णधार शाकिब अल हसन आजच्या सामन्यात खेळला नाही. तो बोटाच्या फ्रॅक्चरमुळे विश्वचषकातून बाहेर पडलाय. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, साखळी सामन्यात त्यांना आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय :

  • बांग्लादेश : तन्झीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान
  • ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, शॉन अ‍ॅबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅडम झम्पा, जोश हेझलवूड

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनं जिंकला ऑक्टोबर 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार
  2. Cricket World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर
  3. Cricket World Cup 2023 : किवींच्या विजयानं पाकिस्तानचं विश्वचषकात 'पॅकअप', उपांत्य फेरीसाठी करावा लागेल चमत्कार; इंग्लंडनं प्रथम फलंदाजी केल्यास 'खेळ खल्लास'

Last Updated : Nov 11, 2023, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.