ETV Bharat / sports

Dharamshala Stadium News : जगातील सर्वाधिक उंचीवर असलेलं धर्मशाळेचं मैदान कसं तयार करण्यात आलं? - आयसीसी

Picture perfect Dharamshala stadium : धर्मशाळा क्रिकेट ग्राउंड, जिथं आज भारत न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या मैदानाची वैशिष्ट्ये हे मीनाक्षी राव यांनी लिहिलंय.

Picture perfect Dharamshala stadium
Picture perfect Dharamshala stadium
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 11:31 AM IST

धर्मशाळा Dharamshala stadium News : धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमच्या हिरव्यागार गवताच्या रिंगच्या बाहेर उभे राहिल्यावर ताज्या पांढर्‍या रंगाच्या धौला धार शिखरांनी नटलेलं, एक उतार असलेली टेकडी या नयनरम्य क्रिकेटच्या मैदानात कशी बदलली गेली असेल याचं आश्चर्य वाटतं. खरंच, टेकडीवर एक विलक्षण क्रिकेट मैदान बनवण्यासाठी बरंच काम करण्यात आलं.

मैदानाची वैशिष्ट्ये काय : 21,800 आसन क्षमता असलेले मैदान, या हंगामात विश्वचषकाच्या स्पर्धेमुळं आयसीसीच्या रंगात रंगवलं गेलंय. जगाच्या विविध भागांमध्ये टेकड्यांवरील मैदानं आहेत, परंतु, हे जगातील सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम आहे. तसंच जगातील एकमेव क्रिकेट मैदान आहे, जिथं दलाई लामा यांनी एकदा बसून संपूर्ण सामना पाहिला होता. धर्मशाळाला या वेळी प्रथमच पाच विश्वचषक सामन्यांचं यजमानपद मिळालंय. या मैदानावर यापूर्वी T2O विश्वचषक सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.

स्टेडियमवर सुविधा काय : हे स्टेडियम 2005 मध्ये सुरू झालं. पण आठ वर्षांनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामन्याचं यजमानपद मिळालं. त्यावर, नेहमीच्या दिव्यांपेक्षा तिप्पट शक्तिशाली एलईडी दिवे, स्टेडियमला प्रकाश देणारा रंगीबेरंगी दर्शनी भाग, एलईडी दिवे असलेले मार्ग, 26 आधुनिक स्वच्छतागृहे अशा अनेक सुविधा आहेत. असं असलं तरी महत्त्वाच्या सामन्याचं यजमानपद या मैदानाला देण्यात आलं नाही. याचे कारण मोठ्या क्रीडा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. इतर मोठ्या शहरातील स्टेडियमच्या तुलनेत, येथील पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. हे शहर लहान आहे, हॉटेल्स मर्यादित आहेत.

  • सर्वाधिक धावसंख्या कोणाची : या मैदानावर सर्वाधिक धावा इंग्लंडनं केल्या आहेत. त्यांनी बांगलादेश विरोधात 364/9 धावा केल्या होत्या. तर सर्वात कमी धावसंख्या भारताच्या नावावर असून त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 112/10 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. World Cup २०२३ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात कोण मारणार बाजी?
  2. World Cup 2023 IND vs NZ : जखमी हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार, राहुल द्रविडनं स्पष्टचं सांगितलं
  3. Cricket World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापुर्वी टीम इंडियाला दुहेरी झटका; 'हे' दोन स्टार खेळाडू जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.