ETV Bharat / sports

Afghanistan Cricket Team : ना स्वतःचं स्टेडियम, ना सरकारची मदत तरीही...; वाचा अफगाणिस्तान क्रिकेट संघाची प्रेरणादायी कथा - अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड

Afghanistan Cricket Team : क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केल्यानं अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की या संघाला 2 वर्षांपूर्वी टी-20 विश्वचषकासाठी प्रायोजकही मिळालेला नव्हता.

Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket Team
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 10:06 AM IST

हैदराबाद Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासात 23 ऑक्टोबर 2023 ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल. क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा फक्त तिसरा विजय आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तानने मिळविलेल्या विजयाची चर्चा झाली.

जागतिक क्रमवारीत 9व्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्ताननं दुसऱ्या क्रमांकाचा संघ माजी विश्वविजेता पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत मोठा उलटफेर निर्माण केलाय. या ऐतिहासिक विजयानंतर जगभरात अफगाण संघाविषयी चर्चा सुरू झाली. तसंच अभिनंदनही होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का, अफगाणिस्तान संघाच्या या विजयाच्या आणि खेळाडूंच्या आनंदामागं संघर्षाची कहाणी आहे. खेळाडूंची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीनं हा विजय मिळाला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट इतिहास : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली. तेव्हा त्याची स्थापना अफगाण निर्वासितांनी पाकिस्तानमध्ये केली होती. त्यानंतर 2001 मध्ये हा संघ ICC संलग्न सदस्य बनला. 2013 मध्ये, तो ICC सहयोगी सदस्यदेखील बनला. सहयोगी दर्जा मिळेपर्यंत तो पाकिस्तानी देशांतर्गत क्रिकेटच्या दुय्यम स्तरावर खेळला. पाकिस्तानमधील काही स्पर्धांनंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघानं हळूहळू आशिया खंडात स्पर्धा खेळायला सुरुवात केली.

अफगाणिस्तानात कोणतेही स्टेडियम नाही : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडं स्वतःचं कोणतेही स्टेडियम नाही. अफगाणिस्तानमधील तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळं अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकलेला नाही. या कारणास्तव, अफगाणिस्तान संघ आपले सर्व घरगुती सामने इतर देशांमध्येच खेळतो. तालिबान सत्तेत आल्यानंतर भविष्यात अफगाणिस्तानातही क्रिकेटचे सामने होण्याची शक्यताही कमी आहे.

तालिबान सरकारचा पाठिंबा नाही : पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये खूप आनंद साजरा केला जातोय. परंतु, मायदेशातील तालिबान सरकार अफगाणिस्तान क्रिकेट संघाला समर्थन देत नाही. तालिबान सरकारला क्रिकेट हा खेळ आवडतो. पण या खेळाला चालना देण्यासाठी सरकारनं कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. ICC आणि ACC व्यतिरिक्त BCCI आणि इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून बोर्डाला पैसे मिळतात. तसंच अफगाणिस्तानचे खेळाडू जगभरात आयोजित टी-20 लीगमध्ये खेळतात.

2021 च्या विश्वचषकासाठी नव्हता प्रायोजक : यंदाच्या विश्वचषकात आधी गतविजेता इंग्लंड आणि आता पाकिस्तानला पराभूत करणारा अफगाणिस्तान क्रिकेट संघासामोर आता प्रायोजकांची रांग लागू शकते. पण एक काळ असा होता की, या संघाला प्रायोजक मिळत नव्हते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 2021 साली आयोजित ICC टी-20 विश्वचषकासाठी अफगाण संघाला कोणताही प्रायोजक मिळाला नव्हता. अशा परिस्थितीत माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू मोहम्मद नबीनं संपूर्ण संघाला प्रायोजित केलं होतं. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात राष्ट्रगीत गाताना मोहम्मद नबी भावूक झाला होता. तसचं त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.

अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भारताची भूमिका : अफगाणिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावलीय. बहुतेक सर्व अफगाण खेळाडूंनी भारतीयांकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतलंय. कारण अफगाणिस्तानात सततच्या हिंसाचारामुळं सामने खेळवणं शक्य होत नाही. याशिवाय त्यांच्या देशात क्रिकेटशी संबंधित सुविधांचाही अभाव आहे. त्याचबरोबर भारतातही क्रिकेटच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. यामुळं बहुतेक खेळाडूंनी भारतातच प्रशिक्षण घेतलंय. यात भारत सरकार आणि बीसीसीआयनं अफगाणी खेळाडूंना खूप मदत केलीय. 2015 मध्ये अफगाणिस्ताननं नोएडा स्टेडियमला ​​त्यांचं घरचं मैदान बनवून आयर्लंडविरुद्ध मालिका खेळली. यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं डेहराडून आणि लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमचा होम स्टेडियम म्हणून वापर केला. इथं अनेक सामने खेळले. याचा परिणाम म्हणजे अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारत आणि भारतीय लोकांबद्दल विशेष आपुलकी आणि आदर आहे.

भारत बांधणार होता 2 स्टेडियम : अफगाणिस्तान हा भारताचा मित्र देश आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे चांगले संबंध आहेत. तालिबान सरकार येण्याआधी भारतानं अफगाणिस्तानमध्ये दोन क्रिकेट स्टेडियम बांधण्याच्या दिशेनं पावलं उचलली होती. ही स्टेडियम कंदहार आणि मजार-ए-शरीफ इथं बांधली जाणार होती. यासाठी भारत सरकारनं 2014 मध्ये स्टेडियमसाठी 1 दशलक्ष डॉलर्सची मदतही मंजूर केली होती. दोन्ही स्टेडियमचे काम सुरू होते, मात्र आता तालिबानी राजवटीनंतर हे काम रखडलंय.

  • यंदाच्या विश्वचषकात अफगाणिस्ताचा प्रायोजक आहे अमूल प्रायोजक : भारतातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघाचा मुख्य प्रायोजक अमूल आहे. विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान संघाच्या जर्सीवर तसेच सराव किटवर अमूलचे नाव दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Cricket world cup 2023 : पाकिस्तानच्या पराभवानं बदलला गुणतक्ता, इंग्लंड तळाला तर अफगाणिस्ताननं घेतली झेप
  2. Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्तान आता कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, पाकिस्तानवरील विजय अनपेक्षित नव्हता - पटवाल
  3. Cricket World Cup २०२३ : द. आफ्रिकेचं पारडं जड, बांग्लादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.