दुबई - इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) शुक्रवारी ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पुरुषांच्या टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील टीमच्या गटांची घोषणा केली आहे. यात विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. यात शोपीस इव्हेंटच्या गटातील टप्प्यात या दोन्ही संघांची टक्कर होईल.
ओमानमध्ये झालेल्या आयसीच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. यावेळी बीसीसी अध्यक्ष अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
-
All you need to know right here 👉 https://t.co/lQK0sX5xv5#T20WorldCup https://t.co/fJnbCJdHDD
— ICC (@ICC) July 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All you need to know right here 👉 https://t.co/lQK0sX5xv5#T20WorldCup https://t.co/fJnbCJdHDD
— ICC (@ICC) July 16, 2021All you need to know right here 👉 https://t.co/lQK0sX5xv5#T20WorldCup https://t.co/fJnbCJdHDD
— ICC (@ICC) July 16, 2021
२० मार्च २०२० रोजी असलेली टीम रँकिंगच्या आधारावर ग्रुपची निवड करण्यात आली असून गत विजेता वेस्ट इंडिजचा संघ सुपर 12 च्या पहिल्या गटात गत उपविजेता इंग्लँड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या संघासोबत निवडण्यात आलाय. राऊंड 1 मधील दोन पात्रता गटात त्यांचा समावेश आहे.
आयसीसी पुरूष टी -२० विश्वचषक 2021 या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे.
ग्रुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा श्रीलंकासोबत समावेश आहे, तर ग्रुप 'बी' मध्ये ओमान, पीएनजी आणि स्कॉटलंडचा सामना बांगलादेशशी होईल.
2016 नंतर होणारा हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे. 3 एप्रिल 2016 रोजी वेस्ट इंडिज आणि इंग्लँड यांच्या अंतिम सामना झाला होता. वेस्ट इंडिजने 4 गडी राखून हा सामना जिंकून टी-20 चे दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले होते.
हेही वाचा - ENG vs IND: मोठी अपडेट, भारतीय क्रिकेट संघातील दोन खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटि्व्ह