दुबई - आगामी बहुचर्चित आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे ठिकाण आणि तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने टी-२० विश्वकरंडक यूएई आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये टी-२० विश्वकरंडकाच्या तारखेबाबत उत्सुकता होती. आज आयसीसीने याची घोषणा केली.
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी, ४ वर्षांची बंदी
मूळ कार्यक्रमानुसार आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन मागील वर्षी भारतात करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. या वर्षी कोरोनाची स्थिती काहीशी निवळल्यानंतर विश्वकरंडकाचे आयोजन करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. अशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि स्पर्धा पुन्हा पुढे ढकलावी लागली. आता कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाटेचा अंदाज पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यासंबंधीचा विचार केला. या प्रकरणी आयसीसीने २८ जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं होते. बीसीसीआयने सोमवारी याबाबतचा निर्णय आयसीसीला कळवला. तेव्हा आज आयसीसीने टी-२० विश्वकरंडकचे स्थान आणि तारखांची घोषणा केली.
-
🚨 ANNOUNCEMENT 🚨
— ICC (@ICC) June 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👉 https://t.co/FzfXTKb94M pic.twitter.com/8xEzsmhWWN
">🚨 ANNOUNCEMENT 🚨
— ICC (@ICC) June 29, 2021
Details 👉 https://t.co/FzfXTKb94M pic.twitter.com/8xEzsmhWWN🚨 ANNOUNCEMENT 🚨
— ICC (@ICC) June 29, 2021
Details 👉 https://t.co/FzfXTKb94M pic.twitter.com/8xEzsmhWWN
आयसीसीने आज मंगळवारी टी-२० विश्वकरंडक यूएई आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायेद स्टेडियम, अबुधाबी, शाहजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे होणार आहेत. आठ पात्र संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या फेरीचे सामने ओमान आणि युएई येथे होतील. यातून चार संघ सुपर १२ साठी पात्र ठरणार आहेत.
हेही वाचा - ९ चेंडूत पडल्या ५ विकेट, अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज, लॉर्ड्सवरचा थरारक सामना
हेही वाचा - Ind vs SL : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना, पाहा फोटो