ETV Bharat / sports

लांडगे हटाव कुस्ती बचाव म्हणत, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे आमरण उपोषण - लांडगे हटाव कुस्ती बचाव

लांडगे हटाव कुस्ती बचाव म्हणत आणि कुस्ती खेळत राज्यातील पैलवान आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण ( Hunger strike of wrestlers' association ) केले जात आहे.

Hunger strike
Hunger strike
author img

By

Published : Mar 11, 2022, 4:27 PM IST

पुणे : पुण्यातील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ( Maharashtra State Wrestling Council ) बाहेर पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला अनेक माजी महाराष्ट्र केसरी तसेच अनेक कुस्तीपटूंनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी कुस्ती खेळत लांडगे हटाव कुस्ती बचाव म्हणत घोषणाबाजी करण्यात आली.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे आमरण उपोषण

सिटी कार्पोरेशन व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत ( Maharashtra Kesari Competition ) झालेल्या कराराची प्रत मिळावी, यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे आणि पुत्र ललित लांडगे यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशन यांच्यात महाराष्ट्र केसरीबाबत जो करार करण्यात आला होता. तो काय होता. नेमकं त्याचं काय झालं, याबाबत परिषदेच्या सभासद यांना देखील माहिती दिली जात नाही.

कुस्ती खेळताना पैलवान
कुस्ती खेळताना पैलवान

मुख्य आयोजक सिटी कार्पोरेशन असून देखील शासनाच्या वतीने निधी मागवला जात आहे. तसेच महाराष्ट्र केसरीमध्ये जे बक्षीस जाहीर झालं होतं, ते देखील देण्यात आलेलं नाही. मोठ्या प्रमाणात या पिता पुत्राच्या माध्यमातून कुस्तीपटूंची फसवणूक करण्यात आली आहे. म्हणून आत्ता या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे आणि पुत्र ललित लांडगे यांना हटवण्यात यावे. यासाठी हे उपोषण सुरू असल्याचे यावेळी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे ( Pune City National Training Association ) अध्यक्ष योगेश दोडके यांनी सांगितलं.

पवारांनी याकडे लक्ष द्यावं -

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे कुस्तीगीर परिषदेचे 40 वर्षांहून काळ अध्यक्ष आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात कुस्ती पोहचविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता याकडे लक्ष द्यावं. अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.