ETV Bharat / sports

IPL 2022 Prize Money : आयपीएल फायनल जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या संघालाल मिळणार 'एवढे' पैसे - टाटा आयपीएल 2022

इंडियन प्रीमियर लीग 2022 ( IPL 2022 ) चा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी अंतिम फेरी गाठली आहे. 29 मे (रविवार) रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. या सामन्यानंतर, एक पुरस्कार सोहळा होईल, ज्यामध्ये चॅम्पियन संघ ( IPL 2022 Title Winner ) आणि अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला बक्षीस रक्कम दिली जाईल. यासोबतच आणखी अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

IPL 2022 Prize Money
IPL 2022 Prize Money
author img

By

Published : May 29, 2022, 6:38 PM IST

हैदराबाद: आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखली जाते. दरवर्षी या लीगमध्ये क्रिकेट जगतातील मोठे खेळाडू खेळायला येतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केले जातात, पण आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून दिली ( How much reward ) जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? आयपीएलमध्ये चॅम्पियन बनणाऱ्या संघापासून ते चौथ्या स्थानापर्यंतच्या संघाला बक्षिसाची रक्कम दिली जाते. आयपीएल 2022 मध्ये कोणत्या नंबरचा संघ किती मालमाल होईल चला जाणून घेऊया....

आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स ( Gujarat Titans and Rajasthan Royals ) यांच्यात होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला ( IPL 2022 Title Winner ) 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. जगभरात खेळल्या जाणार्‍या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये हे बक्षिस सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील. गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती. आयपीएल 2022 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांना 7-7 कोटी रुपये देखील दिले जातील.

पहिल्या सत्रातील बक्षीसाची रक्कम -

आयपीएल स्पर्धा 2008 ( IPL 2008 ) मध्ये सुरू झाली आणि हा 15 वा हंगाम खेळला जात आहे. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात फायनल जिंकणाऱ्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही बक्षीस रक्कम आता जवळपास चौपट वाढली आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 कोटी देण्यात आले होते. यंदाही ही बक्षीस रक्कम तितकीच ठेवण्यात आली आहे.

आयपीएल ही इतर देशांच्या लीगपेक्षा वेगळी -

जगभरात खेळल्या जाणाऱ्या विविध T20 लीगमध्ये जास्त बक्षीस रक्कम दिली जात नाही. आयपीएलनंतर कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक मोठी रक्क्म बक्षीस म्हणून दिली जाते. सीपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 7.5 कोटी रुपये दिले जातात. त्याच वेळी, पाकिस्तान सुपर लीग (PSL) पेक्षा बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्ये अधिक बक्षीस रक्कम दिली जाते. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये 6.34 कोटी रुपये आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये 3.73 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाते.

आयपीएलमध्ये खर्च केलेल्या रकमेवरून ही लीग नेहमीच चर्चेत असते. संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, अनेक पुरस्कार देखील दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, फेअर प्ले अवॉर्ड आदी पुरस्कारांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यात दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांच्या रकमेबद्दल सांगणार आहोत.

आयपीएल स्पर्धेत दिलेले जाणारे वेगवेगळे पुरस्कार -

  • आयपीएल ऑरेंज कॅप: हा पुरस्कार संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिला जातो.
  • फेअर प्ले अवॉर्ड: हा पुरस्कार संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक शिस्तीने खेळलेल्या आणि कोणतेही गैरवर्तन न केलेल्या संघाला दिला जातो.
  • सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन: हा पुरस्कार संपूर्ण आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या फलंदाजाला दिला जातो.
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर: हा पुरस्कार आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
  • आयपीएल पर्पल कॅप: संपूर्ण आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हा या पुरस्काराचा मानकरी असतो.
  • सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार: हा पुरस्कार मोसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला दिला जातो.

आयपीएल स्पर्धेत वेगवेगळ्या पुरस्कांरासोबत दिली जाणारी रक्कम -

पुरस्कार

बक्षिसाची रक्कम
पर्पल कॅप 15 लाख
ऑरेंज कॅप 15 लाख
सुपर स्ट्रायकर15 लाख
क्रैक इट सीक्सेज ऑफ द सीजन 12 लाख
पावर प्लेयर ऑफ द सीजन 12 लाख
मोस्ट वॅलयूबल प्लेयर ऑफ द सीजन 12 लाख
गेम चेंजर ऑफ द सीजन 12 लाख
इमरजिंग प्लेयर ऑफ द सीजन 20 लाख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.