ETV Bharat / sports

मी नेहमीच कठोर परिश्रम घेतली आहे आणि पुढेही घेत राहीन - अष्टपैलू हार्दिक पांड्या - अहमदाबाद फ्रेंचायझी सीव्हीसी कॅपिटल

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे (All-rounder Hardik Pandya) म्हणने आहे की, तो कठोर मेहनतीवर विश्वास करतो. तो सध्या आयपीएल 2022 आणि आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी कसून मेहनत घेत आहे.

हार्दिक पांड्या
HARDIK PANDYA
author img

By

Published : Jan 31, 2022, 1:09 PM IST

नवी दिल्ली: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बराच काळ भारतीय संघातून बाहेर आहे. हार्दिक पांड्या म्हणाला, या वर्षाच्या शेवटी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) नजरेसमोर ठेऊन, तो आपल्या फिटनेसवर काम करत आहे. फिटनेसमध्ये समतोल राखण्यासाठी तो कठोर मेहनत घेत आहे. तसेच तो म्हणाला की, तो कठोर मेहनतीवर विश्वास करतो. त्याने इकोनॉमिक टाइम्स सोबत बोलताना सांगितले.

हार्दिक पांड्या इकोनॉमिक टाइम्सला म्हणाला (Hardik Pandya told the Economic Times), मी नेहमी संघाचे हित लक्षात घेत स्वत:ला पुढे केले आहे. परंतु या वेळेस मला स्वत:ला शारिरीक आणि मानसिक रुपाने तयार करण्यासाठी मला वेळ हवा होता. तसेच मला माझ्या कुटुंबासाठी काही वेळ काढायचा होता. बायो-बबलमध्ये राहून आम्ही खूप वेळ व्यथित केला आहे. बायो-बबलमध्ये राहणे खूप अवघड आहे.

तो म्हणाला, तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर वेळ घालवता आणि हे शेवटी तुमच्यावर भारी पडते. मला स्वतःवर चिंतन करण्यासाठी आणि मला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्या गोष्टी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मला वेळ हवा होता. मी नेहमीच मौनात मेहनत केली आहे आणि यापुढेही करत राहीन.

अहमदाबाद फ्रेंचायझी सीव्हीसी कॅपिटलने (Ahmedabad Franchise CVC Capital) आपल्या संघासाठी हार्दिक पांड्य़ाची निवड केली आहे. तो यंदाच्या हंगामात अहमदाबाद संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या अगोदर पाच वेळा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने (Five-time winners Mumbai Indians) त्याला रिलीज केले होते. त्यानंतर अहमदाबाद फेंचायझीने त्याच्या सोबत करार केला. त्यामुळे तो आयपीएल 2022 च्या हंगामात (IPL 2022 season) या अहमदाबाद संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा: Icc Under 19 World Cup:अंडर 19 विश्वचषक सामन्यादरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.