ETV Bharat / sports

Captain Rohit Sharma : रोहित शर्माने सर्व चाहत्यांना आणि देशाला दिल्या होळीच्या शुभेच्छा - Cricket updates

आज देशभरात मोठ्या थाटामाटात होळीचा सण साजरा केला जात आहे.आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट केला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma
author img

By

Published : Mar 18, 2022, 1:33 PM IST

मुंबई : रंगांचा सण होळी आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. लोक त्यांच्या मित्रपरिवारासह होळी खेळत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू सध्या मुंबईत आयपीएलची तयारी करत आहेत, मात्र तेही होळी साजरी करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्व चाहत्यांना आणि संपूर्ण देश वासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या ( Happy Holi from Rohit Sharma ) आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ज्यामध्ये रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी रितिका देखील आहे. जी रोहित शर्माच्या बाजूला उभा आहे. तसेच रोहित शर्मा चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे पण कर्णधार पूर्णपणे गोंधळलेला दिसत आहे. यामुळेच रोहित शर्माने या शुभेच्छाचा व्हिडिओवर तयार करताना अनेक रिटेक घ्यावे लागत असल्याने रोहित शर्मा वैतागलेला दिसत आहे. ज्यामध्ये तो एडिटरकडून एडिट करुन घ्या असे सांगत आहे. तसेच तो वैतागून डिरेक्टर आणि कॅमेरामॅन कोण आहे, असे विचारताना देखील दिसत आहे. शेवटी-शेवटी होळीच्या शुभेच्छाचा डायलॉग तुम्ही एडिट करुन त्यात अॅड करा, असे म्हणत आहे.

व्हिडिओ पोस्ट करताना मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) लिहिले की, 'कॅप्टन सर, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात? ५३२६१ रिटेक घेतल्यानंतर रोहित शर्माने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही दिसत आहे. कोणता टेक योग्य आहे, यावर रोहित सतत त्याच्याशी वाद घालत असतो. तसे, हा व्हिडीओ मस्करीमध्ये बनवण्यात आला असून चाहते त्याचा खूप आनंद घेत आहेत.

  • Wish you all a very Happy and safe Holi. Let the colors of this festival spread love and happiness. Hope you all enjoy & treasure some joyful moments with friends and family. 😊

    — Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी दिल्या होळीच्या शुभेच्छा -

रवींद्र जडेजाने देखील चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना लिहिले की, हा प्रेम आणि आनंदाचा सण आहे, तो तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत साजरा करा. अनुभवी फलंदाज विराट कोहलीनेही चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच बऱ्याच खेळाडूंनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.