ETV Bharat / sports

Sourav Ganguly Birthday : क्रिकेटचा 'दादा'...ज्याने टीम इंडियाला लावली जिंकण्याची सवय!

भारतीय क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली 8 जुलै रोजी 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट चाहते गांगुलीला 'दादा' आणि 'प्रिन्स ऑफ कोलकाता' म्हणून ओळखतात.

Sourav Ganguly Birthday
सौरव गांगुलीचा वाढदिवस
author img

By

Published : Jul 8, 2023, 4:28 PM IST

मुंबई : 'क्रिकेटचा मक्का' म्हटल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण. सुरुवात इतकी चांगली झाली की पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर पुढच्या कसोटीतही त्याने शतक झळकावले. पुढे कर्णधारपद मिळाल्यावर त्याने देशाला जिंकण्याची सवय लावली. त्याची अशी 'दादागिरी' पाहून अवघे क्रिकेट जगत थक्क झाले. होय! 'प्रिन्स ऑफ कोलकाता', 'बंगाल टायगर', 'गॉड ऑफ द ऑफ साइड' अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीबद्दल आम्ही बोलत आहोत. भारतीय चाहत्यांचा लाडका 'दादा' आज (8 जुलै) 51 वर्षांचा झाला आहे.

संघाला लढायला आणि जिंकायला शिकवले : 'दादा'च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवी उंची गाठली. गांगुलीने वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारख्या स्टार क्रिकेटपटूंच्या करिअरला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महेंद्रसिंह धोनीनेही गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले. गांगुली हा असा कर्णधार म्हणून स्मरणात राहील ज्याने आपल्या संघाला लढायला आणि जिंकायला शिकवले.

गांगुलीची 'दादागिरी' : गांगुलीच्या 'दादागिरी'चे किस्से आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. 13 जुलै 2002 रोजी इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांच्या जादुई खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करून नेटवेस्ट मालिकेवर कब्जा केला. त्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत गांगुलीने आपला टी-शर्ट काढून अशा प्रकारे सेलिब्रेशन केले की ही घटना इतिहासाच्या पानांमध्ये नोंदली गेली.

  • 16+ years of international cricket and countless matches later… on this 51st bday, I sum up my learnings for you. They are now yours!
    Announcing “Sourav Ganguly Masterclass”, an app that has my first-ever online course on leadership - https://t.co/fX0dM4NVTb

    Thanks to… pic.twitter.com/Dek5fBzBM5

    — Sourav Ganguly (@SGanguly99) July 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गांगुलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज सौरव गांगुली भारताकडून 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळला. स्टायलिश डावखुरा फलंदाज सौरव गांगुलीने कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्यामध्ये 16 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. गांगुलीच्या वनडेमध्ये 41.02 च्या सरासरीने 11363 धावा आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये गांगुलीच्या बॅटने 22 शतके आणि 72 अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 132 विकेट घेतल्या आहेत.

कर्णधार म्हणून यशस्वी : सौरव गांगुलीने 49 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. गांगुलीने भारतीय संघाला अशा टप्प्यावर आणले, ज्याला देशाबाहेरही कसे जिंकायचे हे माहीत होते. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2003 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. त्याचवेळी, 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत संयुक्त विजेता होता. गांगुलीने 2019-22 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

हेही वाचा :

  1. HAPPY BIRTHDAY MS DHONI : महेंद्रसिंह धोनीचा 42 वा वाढदिवस; जाणून घ्या धोनीशी संबंधित 42 खास गोष्टी...
  2. Tamim Iqbal : पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर बांग्लादेशच्या कर्णधाराचा निवृत्तीचा निर्णय मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.