मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans v Lucknow Supergiants ) यांच्यात झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने पाच विकेट्सने लखनौ सुपरजायंट्सवर ( Gujarat Titans won by 5 wkts ) विजय मिळवला. लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 158 धावा केल्या होत्या. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाला 159 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य गुजरात संघाने 19.4 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 161 धावा करत पूर्ण करत आपला पहिला विजय नोंदवला.
-
🎼 For best results, read this while humming 𝙋𝙚𝙝𝙡𝙖 𝙣𝙖𝙨𝙝𝙖 ...𝙥𝙚𝙝𝙡𝙖 𝙠𝙝𝙪𝙢𝙖𝙖𝙧#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/zD8yA4CQDg
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🎼 For best results, read this while humming 𝙋𝙚𝙝𝙡𝙖 𝙣𝙖𝙨𝙝𝙖 ...𝙥𝙚𝙝𝙡𝙖 𝙠𝙝𝙪𝙢𝙖𝙖𝙧#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/zD8yA4CQDg
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022🎼 For best results, read this while humming 𝙋𝙚𝙝𝙡𝙖 𝙣𝙖𝙨𝙝𝙖 ...𝙥𝙚𝙝𝙡𝙖 𝙠𝙝𝙪𝙢𝙖𝙖𝙧#SeasonOfFirsts #AavaDe #GTvLSG #TATAIPL pic.twitter.com/zD8yA4CQDg
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022
सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने ( Captain Hardik Pandya ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्स संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. या संघाने आपली पहिली विकेट केएल राहुलच्या रुपाने पहिल्याच चेंडूवर गमावली. त्याला अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने चकवा दिला. त्यानंतर मनिष पांडे आणि क्विंटन डी कॉक यांना बाद करत मोहम्मद शमीने लखनौ सुपरजायंट्सला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे पावरप्लेमध्ये त्यांची अवस्था 4 बाद 29 अशी झाली होती. ज्यामध्ये एविन लुईस देखील 10 धावा करुन परतला होता.
दरम्यान दीपक हुड्डा आणि नवोदित खेळाडू आयुष बदोनीने ( Newcomer Ayush Badoni ) यांनी आपल्या संघाला सावरले. त्यांनी पाचव्या विकेट्ससाठी 87 धावांची भागीदारूी करुन संघाचा डाव सावरला. त्यानंतर या दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर क्रृणाल पांड्याने शेवटी फटकेबाजी केल्याने या संघाने 158 धावा केल्या. गुजरात टायटन्स संघाला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला शुबमन गिलच्या रुपाने पहिला झटका बसला. त्याला चमिराने तंबूत धाडले. त्यानंतर विजय शंकरदेखील त्याच्या पाठोपाठ 4 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मॅथ्यू वेड 30, हार्दिक पांड्या 33 आणि डेविड मिलरने 30 धावांचे योगदान दिले. परंतु राहुल तेवातिया आणि अभिनव मनोहरने अनुक्रमे 40 आणि 15 धावांवर नाबाद राहिले. त्याचबरोबर संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा - WI vs PAK ODI Series: वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर