मुंबई - इंडियन प्रीमियर लीग 2022 ( IPL 2022 ) मधील 43 वा सामना आज ( 30 एप्रिल ) गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ) पडणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Royal Challengers Banglalore Won Toss ) आहे.
आयपीएल मधील गुणतालिकेत बंगळुरु संघ नऊ सामन्यांत 5 विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. तर, यंदाच्या हंगामात पदार्पण केलेल्या गुजरात संघाने आजतागायत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यांत विजय मिळवत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. हा सामना जिंकून बाद फेरीतील स्थान निश्चित करण्याचे आव्हान गुजरातसमोर असणार आहे.
कोहलीचा फॉर्म ढासळला - यंदाच्या हंगामात विराट कोहलीची बॅट अद्यापही तळपली नाही. विराटने नऊ सामन्यांत केवळ 128 धावा काढल्या आहेत. विराटने अर्धशतकी खेळीही अद्याप केली नाही. त्याची सर्वाधिक धावसंख्याही 48 राहिली आहे. राजस्था रॉयल्स विरोधातील सामन्यात विराट प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, या सामन्यात त्याने केवळ 9 धावाच ठोकल्या आहेत. त्यापूर्वीच्या सामन्यामध्येही एकही धावा त्याने काढल्या नव्हत्या. विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्याने त्याचा फटकाही संघाला बसत आहे.
बंगळुरुचा संघ - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
गुजरातचा संघ - शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.