ETV Bharat / sports

Sri Lanka Cricket and Netball Team : कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट आणि नेटबॉल संघाचे भव्य स्वागत - Sri Lanka cricket team

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद ( Sri Lanka Cricket and Netball Team ) पटकावले. रविवारी गतविजेत्या आशियातील नेटबॉल संघ श्रीलंकेने सिंगापूरचा 63-53 असा पराभव करून आशियाई विजेतेपद पटकावले.

Sri Lanka cricket team
श्रीलंका क्रिकेट टीम
author img

By

Published : Sep 13, 2022, 5:37 PM IST

कोलंबो: आर्थिक संकट असतानाही श्रीलंकेने आशिया चषक विजेत्या क्रिकेट आणि नेटबॉल संघांचे मायदेशी परतताना भव्य स्वागत ( SL Cricket and Netball Team Grand Welcome ) केले. त्यांना मंगळवारी विमानतळावरून राजधानी कोलंबोपर्यंत त्यांची मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले. मंगळवारी सकाळपासूनच कॅप्टन दासून शनाका ( Captain Dasun Shanaka ) आणि त्यांच्या टीमच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने लोक जमू लागले होते. शनाका आणि त्याच्या संघाने रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव ( Sri Lanka defeated Pakistan by 23 runs ) करून सहाव्यांदा आशिया चषक विजेतेपद ( Sri Lanka won Asia Cup sixth time ) पटकावले.

अंतिम सामन्यात नाबाद 71 धावांची खेळी करून ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकणाऱ्या भानुका राजपक्षेने ( Player of the match Bhanuka Rajapakse ) बंदरनायके विमानतळावरून बाहेर पडताना सांगितले की, हा संपूर्ण देशाचा विजय आहे. आपण केलेल्या कामातून आपण आपल्या देशातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. देशाच्या आर्थिक संकटाबद्दल भानुका म्हणाला, एक देश म्हणून जग आता आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे.

भानुका राजपक्षे म्हणाला, वर्षानुवर्षे आम्ही विजेतेपदापर्यंत पोहोचू शकलो नाही, पण क्रिकेट चाहत्यांचा आमच्यावरील विश्वास उडाला नाही. स्पर्धेमध्ये आम्हाला खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आणि आता आम्हाला ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक ( T20 World Cup in Australia ) स्पर्धेत हे यश कायम ठेवायचे आहे. रविवारी गतविजेत्या आशियातील नेटबॉल संघ श्रीलंकेने सिंगापूरचा 63-53 असा पराभव करून ( Sri Lanka beat Singapore 63-53 ) आशियाई विजेतेपद पटकावले. या विजयासह श्रीलंकेने 2023 च्या नेटबॉल विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे. संघाने 2018 मध्ये जिंकलेल्या विजेतेपदाचे रक्षण केले तर 2020 चे चॅम्पियनशिप कोविड-19 मुळे रद्द झाले.

दोन आशियाई चॅम्पियन संघांना विमानतळावरून श्रीलंका क्रिकेटचे मुख्यालय आणि नेटबॉल महासंघाच्या मुख्यालयात दोन खुल्या डबल डेकर बसमधून आणण्यात आले. चाहत्यांना त्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले, असे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी एका निवेदनात म्हटले आहे. रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून संघांचे स्वागत केले.

हेही वाचा - David Warner And Ca : डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया कर्णधारपदावरील आजीवन बंदी बदलण्याबाबत करणार चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.