ETV Bharat / sports

माजी क्रिकेटर रमीज राजा पीसीबीचे नवे अध्यक्ष, 3 वर्षे राहणार पदावर

रमीज राजा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नावावर आज पीसीबीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. रमीज हे पाकिस्तानचे 36वे अध्यक्ष आहेत.

Former Pakistan skipper Ramiz Raja formally elected as Pakistan Cricket Board chairman
माजी क्रिकेटर रमीज राजा पीसीबीचे नवे अध्यक्ष, तीन वर्षे राहणार पदावर
author img

By

Published : Sep 13, 2021, 7:08 PM IST

कराची - पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नूतन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. रमीज राजा पुढील तीन वर्षे पीसीबीचे अध्यक्ष राहतील. पीसीबी निवडणूक आयुक्त न्यायाधिश (निवृत्त) अजमत सईद यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत रमीज राजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, रमीज पीसीबीचे 36वे अध्यक्ष आहेत.

  • Mr Ramiz Raja has been elected unanimously and unopposed as Pakistan Cricket Board’s 36th Chairman for a three-year term in a Special Meeting presided over by PCB Election Commissioner, Mr Justice (retd) Sheikh Azmat Saeed.

    More details: https://t.co/IIQDsUS2U9 pic.twitter.com/MMFAc8thnk

    — PCB Media (@TheRealPCBMedia) September 13, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रमीज राजा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, मला या पदासाठी निवडण्यात आले, यामुळे सर्वांचे आभार मानतो. मी सगळ्यांसोबत मिळून पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आशा आहे की, आपल्या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट, मैदानाच्या आत आणि मैदानाबाहेर अधिक बळकट होईल.

एक संघटना म्हणून आमचे काम आहे की, आम्ही संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. यासोबत त्यांना प्रत्येक आवश्यक ती सुविधा आणि पाठबळ देऊ. ज्यामुळे ते चाहत्यांच्या आपेक्षेप्रमाणे क्रिकेट खेळू शकतील, असे देखील रमीज यांनी सांगितलं.

जगभरात पाकिस्तान संघ निडर खेळासाठी ओळखला जात होता. तशी ओळख पुन्हा मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असेही रमीज यांनी सांगितलं.

रमीज राजा चौथे क्रिकेटपटू

रमीज राजा यांनी पाकिस्तानसाठी 255 एकदिवसीय सामने खेळली. यात त्यांनी 8 हजार 674 धावा केल्या. पीसीबीमध्ये रमीज यांचा हा दुसरा कार्यकाल आहे. याआधी त्यांनी 2003 ते 2004 या काळात पीसीबीचे मुख्य कार्यकारी म्हणून काम पाहिले आहे. रमीज पीसीबीचे अध्यक्ष होणारे चौथे क्रिकेटर आहेत. त्यांच्याआधी एजाज बट, जावेद बुर्की आणि अब्दुल कादर यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान पीसीबीचे संरक्षक आहेत. एहसान मनी यांनी पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रमीज राजा हे अध्यक्षपदासाठी इमरान खान यांची पहिली पसंती होती.

हेही वाचा - जसप्रीत बुमराहला मागे टाकत जो रूटने जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार

हेही वाचा - Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी का रद्द झाली?, सौरव गांगुलींनी दिलं स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.