ETV Bharat / sports

रमीज राजा सोमवारी अधिकृतपणे पीसीबीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार - imran khan

रमीज राजा सोमवारी अधिकृतपणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी याची घोषणा केली. गव्हर्नर बोर्डाच्या विशेष बैठक सोमवारी बोलवण्यात आली आहे. यात राजा यांची घोषणा केली जाणार आहे.

Former Pakistan captain Ramiz Raja set to offically take over as PCB chairman on Monday
रमीज राजा सोमवारी पीसीबीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार
author img

By

Published : Sep 11, 2021, 7:50 PM IST

Updated : Sep 11, 2021, 8:00 PM IST

कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रमीज राजा अधिकृतपणे सोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी याची घोषणा केली. गव्हर्नर बोर्डाच्या विशेष बैठक सोमवारी बोलवण्यात आली आहे. यात पीसीबी निवडणूक आयुक्त न्यायाधीश (निवृत्त) शेख अजमत सईद निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतील. ते या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रमीज राजा आणि वरिष्ठ ब्यूरोक्रेट असद अली यांची गव्हर्नर बोर्डाचे नवे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. इमरान खान हे पीसीबीचे मुख्य संरक्षक आहेत. एहसान मनी यांच्या जागेवर पीसीबीचे अध्यक्ष म्हणून रमीज राजा यांची नियुक्ती निश्चित आहे. मनी यांचा कार्यकाळ मागील महिन्यात संपला आहे. पीसीबीने सांगितंल की, बैठकीनंतर नवे अध्यक्ष पत्रकारांशी संवाद साधतील.

रमीज राजा यांची कारकिर्द

रमीज राजा यांनी पाकिस्तानसाठी 57 कसोटी आणि 198 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी कसोटीत 31.8 च्या सरासरीने 2 हजार 833 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 5 हजार 841 धावा आहेत. इमरान खान यांच्या नेतृत्वात रमीज राजा खेळले आहेत. इमरान आणि रमीज हे 1992 विश्वकरंडक संघाचे सदस्य होते.

हेही वाचा - IPL 2021 : भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, खेळाडू यूएईला रवाना

हेही वाचा - ENG vs IND: पैसा आणि IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द करण्यात आली, मायकल वॉनचा गंभीर आरोप

Last Updated : Sep 11, 2021, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.