हैदराबाद: भारताचा माजी सलामीवीर अरुण लाल वयाच्या 66 व्या वर्षी दुसरं लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या भावी पत्नीचे नाव बुलबुल साहा असून ती 38 वर्षांची आहे. म्हणजेच बुलबुल अरुणपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे. हे लग्न 2 मे रोजी कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये होणार आहे. बुलबुल साहा ( Bulbul Saha ) ही व्यवसायाने शिक्षक आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अरुण सध्या बंगालच्या रणजी संघाचा प्रशिक्षक आहेत.
अरुण लाल यांनी रीनाशी पहिले लग्न केले होते आणि दोघांनीही त्यांच्या संमतीने घटस्फोट घेतला होता. या लग्नासाठी क्रिकेटपटूने आपल्या पहिल्या पत्नीचीही मान्यता घेतली असून त्यांच्या संमतीनंतरच बुलबुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्टनुसार, अरुण लालने महिनाभरापूर्वी 38 वर्षीय बुलबुलशी साखरपुडा केला होता आणि आता दोघेही लग्न करणार आहेत. लालचा त्याची पहिली पत्नी रीनापासून घटस्फोट झाला आहे, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो काही काळ तिच्यासोबत राहत होता.
अशीही माहिती समोर येत आहे की, लग्नानंतर अरुण लाल आणि बुलबुल आजारी असलेल्या रीनाचीही काळजी घेतील. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या पदाधिकाऱ्यांशिवाय बंगाल संघाचे खेळाडूही त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
अरुण यांचा जन्म 1 ऑगस्ट 1955 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला होता. त्यांनी भारतासाठी 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेक. यामध्ये त्यानी 729 आणि 122 धावा केल्या. अरुण यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले नाही. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 156 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी 30 शतके झळकावून एकूण 10,421 धावा केल्या. त्यांचे वडील, काका आणि चुलत भाऊ सुद्धा रणजी ट्रॉफी खेळले आहेत. अरुण यांना 6 वर्षांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळेच त्यांनी कॉमेंट्री सोडली. यातून सावरल्यानंतर ते पुन्हा मैदानात परतले, पण प्रशिक्षक म्हणून.
अरुण लाल यांच्या प्रशिक्षणाखाली बंगाल संघाच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली आणि संघ 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. यंदाही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला होता.
हेही वाचा - Rohit Sharma Tweet : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माचे भावनिक ट्विट, म्हणाला...