वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेट संघाने सामन्याला सुरूवात होण्याच्या काही मिनिटाआधी पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यास नकार दिला आणि मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. यामागे त्यांनी सुरक्षेविषयीचे कारण दिलं. तेव्हा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी या कारणासाठी भारताला जबाबदार धरले आणि भारतीय मीडियाने पाकिस्तानची प्रतिमा मलिन केल्याचे आरोप केला. पण न्यूझीलंडला भारताने नाही तर 'फाईव्ह आइज"ने चेतावनी दिली होती. फाईव्ह आइज एक गुप्तचर संघटना असून ती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काम करते.
फाईव्ह आइजने वेलिंग्टनला सल्ला दिला होता की, खेळाडूंना पाकिस्तानमधून परत बोलवून घ्यायला हवं. ज्यानंतर तात्काळ हा दौरा रद्द करण्यात आला. न्यूझीलंडच्या एक वृत्तपत्रात याची माहिती देण्यात आली. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला. पण पाकिस्तानने ही एक आंतरराष्ट्रीय कट असल्याचा आरोप केला आहे.
माध्यमाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी शुक्रवारी म्हटलं की, एक आंतरराष्ट्रीय कटामुळे दौरा रद्द करण्यात आला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने सांगितलं की, न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, सामन्याच्या आधी सुरक्षा योग्य आणि विश्वसणीय समजण्यात आली होती. पण न्यूझीलंडने खेळण्यास नकार दिला. यानंतर न्यूझीलंड क्रिकेट आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसेच न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे पंतप्रधानांनी एकमेकांशी फोनवर चर्चा केली.
चर्चा झाल्यानंतर 12 तासांनी हा दौरा रद्द करण्यात आला. इस्लामाबादमध्ये रशिद अहमद यांनी सांगितलं की, ते हा कट रचणाऱ्याचे नाव घेणार नाहीत. अफगाणिस्तानमध्ये जे काही होत आहे. त्यानंतर काही शक्ती पाकिस्तानला बळीचा बकरा करत आहे. पाकिस्तानच्या माध्यमाने दिलेल्या रिपोर्टनुसार, न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर काही तासांनी अहमद यांनी सांगितलं की, पाकिस्तानमध्ये धोका होता, हे सांगण्यासाठी न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांकडे ठोस पुरावा नव्हता.
हेही वाचा - सेहवागने सांगितलं, धोनी मेंटॉर म्हणून कसा भारतीय संघाचा संकटमोचक ठरू शकतो
हेही वाचा - आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी