लंडन - इंग्लडमधील भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील दोन खेळाडूचा अहवाल कोरोना पॉझिटि्व्ह आल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघाची टीम इंग्लडविरोधात टेस्ट सीरीज सुरू होणार होती. कोरोनाबाधित आढळलेल्या खेळाडुंना क्वारंटाईन केले आहे. खेळाडू असिम्प्टोमॅटिक आढळले आहेत.
-
COVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/R4hL96y4rQ pic.twitter.com/P41Woi029x
">COVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2021
Read @ANI Story | https://t.co/R4hL96y4rQ pic.twitter.com/P41Woi029xCOVID-19: Two Indian cricketers tested positive in UK, one still in isolation but asymptomatic
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2021
Read @ANI Story | https://t.co/R4hL96y4rQ pic.twitter.com/P41Woi029x
खेळाडुंची कोरोना चाचणी पुन्हा 18 जुलैला करण्यात येणार आहे. कारण आयसोलेशनमध्ये त्यांना 10 दिवस पूर्ण होतील. ही माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी युकेमध्ये भारतीय संघाला पाठवलेल्या ईमेलमधून समोर आली आहे. यात त्यांना कोरोनासंदर्भात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला 4 ऑगस्ट रोजी नॉर्टिंघममध्ये सुरूवात होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होत आहे. यामुळे दोन्ही संघ मालिका विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करतील.
हेही वाचा - ENG vs IND: इंग्लंडसाठी वाईट बातमी, स्टार खेळाडूला दुखापत
हेही वाचा - Eng vs Ind : भारतीय खेळाडूंची इंग्लंडमध्ये कुटुंबियासह भटकंती, पाहा फोटो