ETV Bharat / sports

फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये नापास - Varun Chakravarthy Yo Yo Test

बीसीसीआयने ३५ खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी एनसीएकडे पाठवले होते. अहवालानुसार इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी असलेला दुसरा खेळाडूही फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे.

वरुण चक्रवर्ती लेटेस्ट बातमी
वरुण चक्रवर्ती
author img

By

Published : Mar 2, 2021, 3:48 PM IST

मुंबई - टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकीपटू वरुण अपयशी ठरला. वरुणला यो-यो चाचणी द्यावी लागली. यात तो आवश्यक असलेला १७.१ गुणांचा आकडा पार करू शकला नाही.

बीसीसीआयने ३५ खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी एनसीएकडे पाठवले होते. अहवालानुसार इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी असलेला दुसरा खेळाडूही फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे.

टी-२० मालिकेला आता १० दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे वरुण आणि आणखी एका खेळाडूला यो-यो टेस्टच्या दुसर्‍या फेरीसाठी पाठवले जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेनंतर टी-२० मालिका १२ मार्चपासून मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाईल.

हेही वाचा - भारताचा लाडका क्रिकेटपटू बनला 'हिरो'....पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.