ETV Bharat / sports

चेन्नईत अश्विनचा बोलबाला, दिग्गज क्रिकेटपटूची केली बरोबरी

author img

By

Published : Feb 15, 2021, 4:54 PM IST

कसोटीमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी अश्विनने सहाव्यांदा केली आहे. त्यामुळे अश्विनने अशी कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली आहे. हॅडली यांनीही ६ वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.

अश्विन
अश्विन

चेन्नई - भारताचा स्टार खेळाडू रवीचंद्र अश्विनने चेन्नईत सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी शतक झळकावले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाला आकार देत अश्विनने १०६ धावांची खेळी केली. या कामगिरीसह त्याने एका मोठ्या क्रिकेटपटूसोबतच्या विक्रमात बरोबरी साधली आहे.

हेही वाचा - अश्विन मागतोय हरभजनची माफी..! वाचा कारण

कसोटीमध्ये एकाच सामन्यात अर्धशतक आणि एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी अश्विनने सहाव्यांदा केली आहे. त्यामुळे अश्विनने अशी कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रिचर्ड हॅडली यांची बरोबरी केली. हॅडली यांनीही ६ वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.

या विक्रमात इयान बॉथम अव्वल असून त्यांनी ११ वेळा ही कामगिरी केली आहे. तर बांगलादेशच्या शाकिब अल हसनने ९ वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर हेडली आणि अश्विन यांची नावे आहेत. या क्रमवारीत पाचव्या स्थानावर वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल आहे. मार्शलने ५ वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.

या यादीत तीन खेळाडू सहाव्या क्रमांकावर आहेत. भारताचे स्टार माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव, ख्रिस केर्न्स आणि भारताचा रवींद्र जडेजा यांनी त्यांच्या कारकीर्दीत चार वेळा एकाच कसोटीत ५० किंवा त्याहून अधिक धावा काढण्याव्यतिरिक्त पाच किंवा त्याहून अधिक बळी मिळवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.