ETV Bharat / sports

आता टी-२० मालिकाविजयाचे लक्ष्य! भारत-इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० लढत

author img

By

Published : Mar 12, 2021, 1:15 PM IST

इंग्लंडच्या संघातील १६ सदस्यांपैकी १३ जणांना भारतात विविध संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. यात कर्णधार इयान मॉर्गनव्यतिरिक्त, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. भारतात यंदा ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. त्यामुळे संघबांधणी करण्याच्या उद्देशामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

भारत-इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० लढत
भारत-इंग्लंडमध्ये आज पहिली टी-२० लढत

अहमदाबाद - जागतिक टी-२० क्रमवारीतील अव्वल दोन संघ आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकमेकासंमोर उभे ठाकणार आहेत. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने ३-१ अशी खिशात टाकली. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेली विराटसेना टी-२० मालिकाही जिंकण्याच्या उद्देशाने खेळेल. आज सायंकाळी ७ वाजता उभय संघातील पहिला सामना खेळवण्यात येईल.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव हा आजच्या सामन्यातून पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या विविध स्पर्धांमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या सूर्यकुमारला खूप कालावधीनंतर टीम इंडियाचे दार खुले झाले आहे. कसोटी मालिकेत धुवांधार प्रदर्शन केलेला रिषभ पंतही या मालिकेत आकर्षण असेल.

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघेजण भारतासाठी सलामी देतील, असे संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले होते. त्यामुळे डावखुऱ्या शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १४ टी-२० सामने झाले असून दोघांनीही प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत.

इंग्लंडच्या संघातील १६ सदस्यांपैकी १३ जणांना भारतात विविध संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. यात कर्णधार इयान मॉर्गनव्यतिरिक्त, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे. भारतात यंदा ऑक्टोबरमध्ये टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. त्यामुळे संघबांधणी करण्याच्या उद्देशामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

संघ -

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, टी. नटराजन.

इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.

हेही वाचा - आता मराठीतून ऐकायला येणार आयपीएलची कॉमेंट्री!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.