चेन्नई - एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. कसोटी इतिहासातील भारताचा हा पाचवा सर्वात मोठा विजय ठरला. दुसर्या कसोटीत भारताने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६४ धावांवर आटोपला.
तत्पूर्वी, २०१५-१६ मध्ये दिल्ली येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३३७ धावांनी विजय साकारला होता. धावांच्या बाबतीत हा कसोटी इतिहासातील भारताचा सर्वात मोठा विजय आहे. याखेरीज २०१६-१७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ३२१ धावांनी विजय मिळविला, हा त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
-
R Ashwin's numbers in this match 👀#INDvENG pic.twitter.com/IpA7IDnHDU
— ICC (@ICC) February 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">R Ashwin's numbers in this match 👀#INDvENG pic.twitter.com/IpA7IDnHDU
— ICC (@ICC) February 16, 2021R Ashwin's numbers in this match 👀#INDvENG pic.twitter.com/IpA7IDnHDU
— ICC (@ICC) February 16, 2021
भारताच्या कसोटी इतिहासातील सहा प्रमुख विजयांपैकी पाच हे विराट कोहलीच्या नेतृत्वात मिळाले आहेत. चेन्नईतील विजय हा इंग्लंडविरुद्धचा सर्वा मोठा विजय ठरला. या कसोटीपूर्वी, १९८६मध्ये लीड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर २७९ धावांनी विजयाची नोंद केली होती.
तर, दुसऱ्या बाजुला धावांच्या बाबतीत इंग्लंडचा आशिया खंडातील हा सर्वात मोठा पराभव आहे. याआधी, २०१६-१७मध्ये विशाखापट्टणम येथे भारताविरुद्ध त्यांनी २४६ धावांनी सामना गमावला होता.
हेही वाचा - शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद