नवी दिल्ली - भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व इयान मॉर्गनच्या हाती दिले असून लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरलाही या संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी सामन्यांत विश्रांती दिलेल्या मार्क वुड आणि सॅम करन यांनाही संघात कायम राखण्यात आले आहे. टी-२० मालिकेचा पहिला सामना १२ मार्च रोजी अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळला जाईल.
पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या डेव्हिड मलानचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. तर, कसोटी संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही या संघात जागा देण्यात आली आहे. सॅम आणि टॉम करन यांचेदेखील संघात पुनरागमन झाले आहेत.
-
England have named a 16-member squad for the five-match #INDvENG T20I series, starting 12 March. pic.twitter.com/xA6Oz99lqB
— ICC (@ICC) February 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">England have named a 16-member squad for the five-match #INDvENG T20I series, starting 12 March. pic.twitter.com/xA6Oz99lqB
— ICC (@ICC) February 11, 2021England have named a 16-member squad for the five-match #INDvENG T20I series, starting 12 March. pic.twitter.com/xA6Oz99lqB
— ICC (@ICC) February 11, 2021
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : दुसरी कसोटी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मोईन अली आणि आदिल रशीद या दोघांनाही १६सदस्यीय संघात कायम ठेवण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळलेल्या सॅम बिलिंग्जलाही संधी देण्यात आली आहे. या मालिकेचे सर्व सामने अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर खेळले जातील.
इंग्लंडचा टी-२० संघ -
इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, टॉपेली, मार्क वूड.