ETV Bharat / sports

''मोटेरा आणि चेन्नईतील खेळपट्टी भाजी पिकवणाऱ्या मैदानांसारखी'' - कर्सन घावरी लेटेस्ट न्यूज

भारताचे दिग्गज माजी गोलंदाज कर्सन घावरी यांनी आता 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत खेळपट्टीबाबत मत दिले आहे. ''मोटेरा आणि चेन्नईतील खेळपट्टी भाजी पिकवणाऱ्या मैदानांसारखी'', असे मत घावरी यांनी दिले.

कर्सन घावरींची ईटीव्ही भारतला मुलाखत
कर्सन घावरींची ईटीव्ही भारतला मुलाखत
author img

By

Published : Mar 3, 2021, 9:00 PM IST

Updated : Mar 3, 2021, 9:11 PM IST

नवी दिल्ली - सद्या क्रिकेटजगतात भारतीय खेळपट्टीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. चेन्नई आणि मोटेरावर भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटींमुळे खेळपट्टींबाबत विविध मते देण्यात आली. यजमान देश आपल्याला हव्या त्याप्रमाणे खेळपट्ट्या तयार करतात, अशी वक्तव्येसुद्धा समोर आली. भारताचे दिग्गज माजी गोलंदाज कर्सन घावरी यांनी आता 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत खेळपट्टीबाबत मत दिले आहे. ''मोटेरा आणि चेन्नईतील खेळपट्टी भाजी पिकवणाऱ्या मैदानांसारखी'', असे मत घावरी यांनी दिले.

प्रश्न - मोटेरा आणि चेन्नईची खेळपट्टी इंग्लंडसाठी अन्यायकारक ठरली, असे तुम्हाला वाटते का?

उत्तर -अशा खेळपट्टीवर खेळणे मला अयोग्य वाटते. कारण आपले भारतीय क्रिकेटप्रेमी आणि स्टेडियममध्ये खेळ पाहणारे क्रिकेटकडे मनोरंजन म्हणून पाहतात. आपल्या खेळाडूंचे कार्य मनोरंजन करणे हे आहे. पाच दिवसाचा खेळ अवघ्या दोन दिवसात संपला तर तो खेळ संपतो. पहिल्या दोन दिवसात फलंदाज आणि गोलंदाजांसाठी एक आदर्श खेळपट्टी असावी आणि जसजसा काळ वाढत जाईल तसतसे ती बिघडण्याची खात्री आहे. तिसर्‍या दिवसापासून गोलंदाजीला प्रारंभ झाला पाहिजे. चेन्नई आणि अहमदाबादमध्ये तसे नव्हते. ते शेतासारखे होते. फलंदाजाला धावा करणे खूप अवघड होते. हे दोन्ही संघांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे.

प्रश्न - विदेशात गेल्यावर हिरव्या गवताने आच्छादलेली खेळपट्टी होती, या युक्तिवादाचे बहुतेक माजी आणि सध्याचे भारतीय क्रिकेटपटूंनी समर्थन केले.

उत्तर - तुम्ही पाहिलेच असेल की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळपट्टी वेगवान होती. पण सामना तीन दिवसात संपला नाही. सामना पाचव्या दिवसापर्यंत चालला पाहिजे. बाहेरील देशांमध्ये ते वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी देऊ शकतात. परंतु जसजसा काळ पुढे जाईल तसतसे ती खेळपट्टी बिघडण्याची खात्री असते. कारण ते रोज गवत कापतात. इथे गवत असण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्या दिवशी गवत नव्हते. भारत आपल्या क्रिकेटचे वाईट चित्र बनवत आहे.

प्रश्न - जेव्हा खेळपट्टीवर चेंडू टाकला जात होता, तेव्हा नेहमी धूळ उडत होती

उत्तर - ही क्रिकेटची खेळपट्टी नव्हती. ते भाजीपाला पिकवण्याच्या शेतासारखे होते.

प्रश्न - तुम्हाला वाटते की पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत टर्निंग खेळपट्टीवर गेला होता?

उत्तर - बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात असे चालले होते की, त्यांना विश्व कसोटी स्पर्धेत स्थान मिळवावे लागेल. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी भारताला इंग्लंडला ३-१, २-१असे पराभूत करावे लागेल हे माहित होते. ही विचारसरणी कारणीभूत ठरली. दोन्ही संघांसाठी खेळपट्टी एकसारखी होती. परंतु पहिल्या डावात आघाडीमुळे आपण बचावले. इंग्लंडने पहिल्या डावात २५० धावा केल्या असत्या तर काय झाले असते? आपण लढू शकलो असतो.

प्रश्न - या परिस्थितीत आपण भारतीय फलंदाजांना श्रेय देऊ इच्छिता?

उत्तर - त्या खेळपट्टीवर धावा करणे कठीण होते. अशा विकेटवर खेळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आक्रमण करणे. दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमण केले. येथे ते एक किंवा दोन धावा करण्यासाठी गेले नाहीत. ते सर्व चौकार आणि षटकार होते. दुर्दैवाने इंग्लंडची निवड खूपच वाईट होती. कारण डावखुरा फिरकीपटू - जॅक लीच वगळता त्यांनी एकाही फिरकीपटूचा समावेश केलेला नव्हता. रूटने पाच विकेट घेतल्या. तो नियमित गोलंदाज नाही.

प्रश्न - इंग्लंडकडून ही चूक कशी झाली? ते फक्त एक फिरकी गोलंदाज घेऊन खेळले.

उत्तर- खेळ सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षक आणि व्यवस्थापक खेळपट्टी पाहतात. खेळपट्टी कशी होणार आहे याची त्यांना कल्पना आहे. जर तुम्हाला खेळपट्टीवर गवत दिसत असेल तर आपल्याला माहित असेल की आपल्याला वेगवान गोलंदाजांसोबत खेळावे लागेल. खेळपट्टीबद्दल इंग्लंडच्या चुकीच्या विचारसरणीचा हा परिणाम होता.

हेही वाचा - एकाच षटकात ५ षटकार ठोकणारा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये 'फेल'!

Last Updated : Mar 3, 2021, 9:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.