चेन्नई - भारताविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर उभय संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) म्हणण्यानुसार, जोफ्रा आर्चरला उजव्या हाताला इंजेक्शन देण्यात आले आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. चेन्नईतील पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी मोठा विजय साकारला. या सामन्यात आर्चरने तीन गडी बाद केले. मात्र, त्याला आर्चरला दुखापतीला सामोरे जावे लागले.
-
We can confirm that @JofraArcher will miss the second Test against India in Chennai starting on Saturday after having an injection in his right elbow.
— England Cricket (@englandcricket) February 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We can confirm that @JofraArcher will miss the second Test against India in Chennai starting on Saturday after having an injection in his right elbow.
— England Cricket (@englandcricket) February 11, 2021We can confirm that @JofraArcher will miss the second Test against India in Chennai starting on Saturday after having an injection in his right elbow.
— England Cricket (@englandcricket) February 11, 2021
ईसीबीच्या म्हणण्यानुसार, "हे प्रकरण कोणत्याही पूर्वीच्या दुखापतीशी संबंधित नाही. आम्हाला आशा आहे की, आर्चर तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होईल." गेल्या आठवड्यात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलेला उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वगळण्यात आले होते.
चेन्नईत पाहुण्यांचा मोठा विजय -
इंग्लंडने चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात ३३७ धावांवर सर्वबाद झाला. यात इंग्लंड संघाला मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९२ धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.
हेही वाचा - भारतासाठी सिडनी कसोटीत लढलेल्या क्रिकेटपटूला मिळाले कर्णधारपद!