लंडन - भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवस अखेर भारताने ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली आहे. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटके आधीच थांबवण्यात आला. रिषभ पंत १४ धावांवर खेळत आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपले २४वे कसोटी अर्धशतक ठोकले आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात 6 बाद १५१ धावा केल्या आहेत. तीन गडी तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा (४१) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५८) यांनी 100 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला आहे. या जोडीनं २९७ चेंडू म्हणजेच जवळपास ५० षटकं खेळून काढली अन् १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक २९७ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही या जोडीनं नावावर केला.
लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. सुरुवातीला संयमी खेळ करून त्यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. स्थिरावल्यानंतर जोखमीचे फटके मारण्याचं टाळून गॅपमधून ही जोडी चौकार जमवताना दिसली. अजिंक्यला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १२५ चेंडूंचा सामना करावा लागला अन् १५ ऑगस्टला कसोटीत अर्धशतक करणारा महेंद्रसिंग धोनीनंतर तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या आहेत तर इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा करत भारतावर 27 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब राहिली भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले तर कर्णधार विराट कोहलीही अपयशी ठरला.
पुजारा आणि रहाणे खेळपट्टीवर आहेत. खेळ उंचावून टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याची दोघांकडे चांगली संधी आहे. रहाणे 16 तर पुजारा 13 धावांवर खेळत आहेत. भारताची धावसंख्या तीन विकेट गमावून 81 धावा आहेत. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज मार्क वूडने भारताची सलामी जोडी रोहित शर्मा व के.एल. राहुल यांना तंबूत धाडले तर सॅम करनने कर्णधार विराट कोहलीची विकेट घेतली.
भारताची सलामी जोडी के.एल. राहुल व रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 18 धावांची भागीदारी केली. मार्क वूडने राहुलला पाच धावांवर बाद करत सलामी जोडी फोडली. त्यानंतर रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाला. वूडनेच रोहितला माघारी धाडले. पूलचा फटका खेळण्याच्या नादात रोहित बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 27 अशी होती.
त्यानंतर कोहली व पुजाराने सावध खेळ करत धावफलक हलता ठेवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. मात्र डावाच्या 24 व्या षटकात सॅम करनने कर्णधार कोहलीला 20 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या रहाणेने पुजाराच्या साथीने उपहारापर्यंत भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही.
इंग्लंडचा पहिला डाव -
इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या नाबाद खेळीमुळे संपूर्ण इंग्लंडचा पहिल्या डावात ३९१ धावांवर खेळ आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लिश संघाने २७ धावांची आघाडी घेतली. रूटसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. जो रूटने आपल्या 180 धावांच्या खेळीत तब्बत १८ सणसणीत चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने ७ चौकारांसह ५७ तर रोरी बर्न्सने ४९ धावांची खेळ करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारुन दिली. भारताकडून मोहम्मद सिराजने ४ बळी मिळवले तर इशांत शर्माने ३ बळी घेतले.