मुंबई - इंग्लंड दौऱ्यावर गेलेला श्रीलंकेचा क्रिकेट संघ मोठ्या वादात सापडला आहे. श्रीलंकेच्या संघातील तिघा खेळाडूंनी बायो बबलमधून बाहेर पडून कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केला आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्या तीन क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे.
श्रीलंका संघाने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्याची टी-२० मालिका गमावली आहे. या मालिकेनंतर संघातील तीन खेळाडू कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करत बायो बबलमधून बाहेर पडले. यातील कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघेही रस्त्यावर सिगारेट ओढताना दिसत आहेत. इंग्लंडमधील डरहम येथे हे दोन्ही क्रिकेटपटू मास्क न घालता फिरत होते. तर सलामीवीर दानुष्का गुणथिलका हा देखील त्यांच्यासोबत होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या तिघांना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने निलंबित करत त्यांना इंग्लंडमधून मायदेशी परत बोलावले आहे.
-
Sri lankan so called cricketers (clowns) smoking in public places in England 🇬🇧 Our @daniel86cricket who married pak male is busy in blaming india who went semi's and finals in icc tournament from 2014 #cricket #SrilankaCricket #danielalexandar #cricketnews #India pic.twitter.com/uwoFQ3M2e8
— s.p shanmug priyan 🔮 (@p_shanmug) June 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sri lankan so called cricketers (clowns) smoking in public places in England 🇬🇧 Our @daniel86cricket who married pak male is busy in blaming india who went semi's and finals in icc tournament from 2014 #cricket #SrilankaCricket #danielalexandar #cricketnews #India pic.twitter.com/uwoFQ3M2e8
— s.p shanmug priyan 🔮 (@p_shanmug) June 28, 2021Sri lankan so called cricketers (clowns) smoking in public places in England 🇬🇧 Our @daniel86cricket who married pak male is busy in blaming india who went semi's and finals in icc tournament from 2014 #cricket #SrilankaCricket #danielalexandar #cricketnews #India pic.twitter.com/uwoFQ3M2e8
— s.p shanmug priyan 🔮 (@p_shanmug) June 28, 2021
श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ०-३ अशी गमावली. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कारण श्रीलंकेचा संघ ऑक्टोबर २०२० पासून आतापर्यंत ५ सलग टी-२० मालिकेत पराभूत झाला आहे. या पराभवाच्या मालिकेमुळे सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, रोशन महानामा, हसन तिलकरत्ने आणि तिलकरत्ने दिलशान या माजी क्रिकेटपटूंनी श्रीलंकेच्या संघावर जोरदार टीका केली आहे. आता श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा - विराट कोहलीचा 'चमचा' म्हटल्यावर भडकला इरफान पठाण, पलटून विचारला जबराट प्रश्न
हेही वाचा - ICC T20 WC : टी-२० विश्वकरंडकाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा