लंडन - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान एकदिवसीय मालिकेला सुरूवात होण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात इंग्लंडच्या तीन खेळाडूंसह ताफ्यातील एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली. यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला संपूर्ण संघच बदलावा लागला.
पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. ८ जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पण त्याआधी इंग्लंडच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. याशिवाय स्टाफ मेंबरमधील चार जण कोरोनाबाधित आढळले.
इंग्लंड बोर्डाने ही घटना घडल्यानंतर त्या कोरोनाबाधित खेळाडूंचे नाव जाहीर केले नाही. परंतु त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्स संघाचे नेतृत्व करणार, असे जाहीर केले होते. त्यानंतर काही तासात इंग्लंडने आपला १८ सदस्यीय संघ जाहीर केला. यात ९ खेळाडू अनकॅप्ड म्हणजे नविन आहेत. त्यांनी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
दरम्यान, या घटनेमुळे नविन खेळाडूंना संधी मिळाली. या खेळाडूंना अशी अचानक संधी मिळेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी देखील नव्हते. आता संघात स्थान मिळाल्याने, त्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची नामी संधी मिळाली आहे.
असा आहे इंग्लंडचा नवा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), जेक बॉल, ब्रिडन कॅर्स, विल जॅक्स, जॅक क्राऊली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, डॅनी ब्रिग्स, डॅन लॉरेंन्स, डेव्हिड मलान, क्रेग एवर्ट्न, शाकिब महमूद, मॅट पार्किंसन, डेव्हिड पेन, फिल साल्ट, जेम्स विंस आणि जॉन सिम्पसन.
असा आहे पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहिम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हारिस सोहेल, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सऊद शकील, शाहिन शाह अफरीदी आणि उस्मान कादिर.
इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना - ८ जुलै कार्डिफ
- दुसरा एकदिवसीय सामना - १० जुलै लॉर्ड्स
- तिसरा एकदिवसीय सामना - १३ जुलै बर्मिंघम
हेही वाचा - IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?
हेही वाचा - Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण