ETV Bharat / sports

Eng vs Pak : मालिका जिंकलेली असली तरी.., बेन स्टोक्सचा पाकिस्तानला इशारा

इंग्लंडच्या नवख्या संघाने पाकिस्तानचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पराभव करत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने पाहुण्या संघाचा ५२ धावांनी पराभव केला.

Eng vs Pak : ben-stokes-says-england-will-hit-hard-in-last-odi-against-pakistan-as-well
Eng vs Pak : मालिका जिंकलेली असली तरी.., बेन स्टोक्सचा पाकिस्तान संघाला इशारा
author img

By

Published : Jul 11, 2021, 4:25 PM IST

लंडन - बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडच्या नवख्या संघाने पाकिस्तानचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील पराभव करत मालिकेत २-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने पाहुण्या संघाचा ५२ धावांनी पराभव केला. लॉर्ड्स येथे पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ ४५.२ षटकात २४७ धावांवर ऑलआउट झाला. हसनने ५१ धावा देत ५ गडी बाद केले. मात्र पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडचे आव्हान पूर्ण करू शकले नाही, त्यांचा संघ ४१ षटकात १९५ धावांवर ऑलआउट झाला.

पावसामुळे दुसरा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. पण तिसऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पाकिस्तान संघाला इशारा दिला आहे.

सामना संपल्यानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, 'भलेही आम्ही मालिका जिंकलेली असू पण आम्ही तिसऱ्या एकदिवसीय सामना हलक्यात घेणार नाही. आम्ही विजयी लय कायम ठेऊ इच्छित आहोत. अखेरच्या सामन्यात देखील आम्ही विजयाच्या ध्येयानेच मैदानात उतरू आणि विरोधी संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू.'

बाबर आझम सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी -

पाकिस्तान क्रिकेट संघात बाबर आझम महत्वाचा खेळाडू आहे. परंतु त्याचे अपयश संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. बाबर मागील दोन सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. बाबर आझमला पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज साकिब महमूदने शून्यावर बाद केले. दुसऱ्या सामन्यात देखील महमूदनेच बाबरची शिकार केली. त्याने १९ धावांवर खेळणाऱ्या बाबरला पायचित करत तंबूत धाडले. अपयशी कामगिरीमुळे बाबरवर टीकेची झोड उठली आहे.

हेही वाचा - Ban vs Zim Test : १५० धावा करून ठरला संकटमोचक; मैदानाबाहेर जाताच केली निवृत्ती जाहीर

हेही वाचा - WI VS AUS : वेस्ट इंडिजने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा; दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठा विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.