ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यामधील चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 191 धावांवर आटोपला. तेव्हा इंग्लंड संघाने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला, भारतीय संघ या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल का? असे विचारले असता, त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत उमेश यादवला, भारत सद्याच्या घडीला सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो का? असे विचारला असता, उमेश म्हणाला, नक्कीच कारण ज्या पद्धतीने खेळपट्टी आपला रंग दाखवत आहे. ते पाहता भारतीय संघ हे करू शकतं.
आम्ही चांगली धावसंख्या उभारू
पहिल्या डावादरम्यान, खेळपट्टीमध्ये ओलावा होता. यामुळे थोडा बाउन्स मिळत होता. तसेच वातावरण देखील थोडेसे वेगळे होते. पण दुसऱ्या डावात आमचे फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, ते पाहता मला वाटतं की, ते चांगली कामगिरी करतील. आम्ही या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारू, असा विश्वास देखील उमेश यादवने बोलून दाखवला.
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 290 धावांच्या प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या डावात बिनबाद 43 अशी सावध सुरूवात केली आहे.
यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना लय मिळाली
ज्या पद्धतीने आम्ही आमची गोलंदाजी केली, यात 40 मिनिटात आम्ही त्यांचे 2 गडी बाद केले. यानंतर आपण म्हणू शकतो की, हे एक ड्रिफ्ट डाउन सारखं होतं. कारण आम्ही 7 ते 8 षटकात 40 ते 45 धावा दिल्या. यामुळे फलंदाजांना लय मिळाली, अशी कबुली देखील उमेश यादवने दिली.
उभय संघातील मालिका सद्यघडीला 1-1 अशा बरोबरीत आहे. दोन्ही संघ चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
हेही वाचा - विराटने सचिन-पाँटिंगसह दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या कोहलीची कामगिरी
हेही वाचा - IND vs ENG: जेम्स अँडरसनने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम