लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला. उभय संघातील या सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार होती. पण सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश परमार कोरोना बाधित आढळले. यामुळे शुक्रवारी नाणेफेकच्या आधी भारतीय संघाने मैदानात उतरण्यास नकार दिला. यामुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला. या विषयावरून इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने गंभीर आरोप केला आहे.
पैसा आणि आयपीएलमुळे सामना रद्द
मायकल वॉन याने 'द टेलिग्राफ'साठी कॉलम लिहला आहे. यात ते म्हणतात की, प्रामानिकपणे सांगायचे तर पैसा आणि आयपीएलमुळे सामना रद्द करण्यात आला. कारण खेळाडूंना कोरोना संक्रमणाचा धोका आणि आयपीएल मिस करण्याची भिती वाटत असेल. एका आठवड्यात आपण आयपीएल पाहू. यात खेळाडू हसत खेळत भाग घेताना दिसतील. पण त्यांना आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास हवायला हवा होता. आता आपण या व्हायरस संदर्भात खूप काही जाणतो. याची काळजी आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
भारताने खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करायला हवा होता
भारत 20 सदस्यांपैकी 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरू शकला नाही. याचे मला आश्चर्य वाटतं. जे खेळाडू सामन्यात खेळू इच्छित नव्हते, त्यांनी यातून वेगळं व्हायला हवे होते. हे ठीक होतं. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण भारताने 11 खेळाडूंना मैदानात उतरवण्यासाठी शक्य तो प्रयत्न करायला हवा होता. भलेही त्यांना राखीव खेळाडूंसह का होईना मैदानात उतरावे लागले असते. त्यांनी ऑस्ट्रेलियात खूप साऱ्या राखीव खेळाडूंसह विजय मिळवला होता, असे देखील मायकल वॉन याने म्हटलं आहे.
क्रिकेटला या सामन्याची होती गरज
जेव्हा गुरूवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली. ही बाब माझ्यासाठी हिरव्या सिंग्नल होती आणि सामना होणे गरजेचे होते. क्रिकेटला या कसोटी सामन्याची गरज होती. उभय संघातील मालिका रोमांचक होत होती. नाणेफेकीच्या 90 मिनिटे आधी कसोटी सामना रद्द करणे, हे बरोबर नव्हतं, असे देखील वॉन याने सांगितलं.
तसेच सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा जर गुरूवारी करण्यात आली असती तर किमान प्रेक्षक मँचेस्टरचा प्रवास करत आले नसते, असे देखील वॉन याने म्हटलं आहे.
हेही वाचा - Ind vs Eng : मँचेस्टर कसोटी सामना रिशेड्युल करण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया
हेही वाचा - IPL 2021: खास चार्टर प्लेनने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव अबुधाबीत दाखल