ETV Bharat / sports

ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह 4 जण विलगीकरणात - भारत

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफमधील चार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

ENG vs IND: COVID hits Team India: Ravi Shastri tests positive, isolated along with other support staff members
ENG vs IND: रवी शास्त्रींना कोरोनाची लागण, प्रशिक्षकांसह चार जण क्वारंटाईन
author img

By

Published : Sep 5, 2021, 5:02 PM IST

Updated : Sep 5, 2021, 5:13 PM IST

ओवल - भारत आणि इंग्लंड यांच्यात ओवलमध्ये चौथा कसोटी सामना रंगला आहे. उभय संघातील या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होण्याआधी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

बीसीसीसीआयच्या मेडिकल टीमने शनिवारी रवी शास्त्री यांचा लेटरल फ्लो टेस्ट केला होता. यात ते पॉझिटिव्ह आढळले. यानंतर सावधानता म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरेपिस्ट नितिन पटेल यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला.

खेळाडूंची आर-टीपीसीआर चाचणी

रवी शास्त्री यांच्यासह सर्वांची आर-टीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे आणि ते सर्वजण हॉटेलमध्येच राहतील. जो पर्यंत मेडिकल टीमकडून परवानगी मिळत नाही, तो पर्यंत ते भारतीय संघासोबत जोडले जाऊ शकत नाहीत. दरम्यान, भारतीय संघातील इतर सदस्यांची देखील दोन वेळा (काल रात्री आणि आज सकाळी) लेटरल फ्लो टेस्ट करण्यात आली. यात निगेटिव्ह आलेल्या सदस्यांना ओवलमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

बीसीसीआयचा वृत्ताला दुजोरा

बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संदर्भात बीसीसीआयने ट्विट केले आहे. यात ते म्हणतात की, भारतीय संघाच्या चार स्टाफ सदस्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच भारतीय संघात मोठ्या प्रमाणात कोरोना पसरल्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू असून सद्यघडीला मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. चौथा सामना ओवलमध्ये खेळला जात आहे. या सामन्यावर भारतीय संघाने पकड निर्माण केली आहे. भारताकडे 180 हून अधिक धावांची आघाडी झाली आहे.

हेही वाचा - Eng vs Ind : के एल राहुलवर आयसीसीची कारवाई; जाणून घ्या कारण

हेही वाचा - Eng vs Ind : रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताची मोठ्या आघाडीकडे वाटचाल

Last Updated : Sep 5, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.