ETV Bharat / sports

Eng Vs Ind : चौथ्या कसोटी सामन्यातील पराभव पचवणे कठीण - जो रूट - इंग्लंड

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या मलिकेमधील चौथा सामना केनिंग्टन ओवलच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 157 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा कर्णधार पराभवानंतर निराश झाला आहे.

captain-joe-root-said-very-disappointing-defeat-in-fourth-test-match-against-india
चौथ्या कसोटी सामन्यातील पराभव पचवणे कठीण - जो रूट
author img

By

Published : Sep 7, 2021, 6:37 PM IST

ओवल - भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पराभव इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मान्य केला. हा पराभव निराशजनक असून हे पचवणे खूप कठीण असल्याचे जो रूटने सांगितलं.

भारताने ओवलच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात यजमान इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर बोलताना जो रूट म्हणाला की, हे खूप निराशजनक आहे. विशेष करून तेव्हा, जेव्हा आम्हाला विजयाची संधी होती. दुसऱ्या डावात सर्वबाद होणे, याचा स्वीकार करणे कठीण आहे. पण आम्ही लॉर्ड्स कसोटीतून बोध घेत हेडिंग्ले कसोटीत शानदार वापसी केली होती, ते पाहिलं असेल. अशीच वापसी आम्ही ओल्ड ट्रेफोर्डमध्ये करू.

ओवल कसोटी सामन्यात आम्ही अनेक वेळा पुढे होतो. आम्हाला संधी देखील होती. यात काही लपवण्यासारखं नाही. आम्ही उगीच गोड बोलणार नाही. पण आम्हाला या सामन्यातून खूप काही शिकायला मिळाले, असे देखील जो रूट म्हणाला.

भारताने असा जिंकला सामना -

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्याच्या मलिकेमधील चौथा सामना केनिंग्टन ओवलच्या मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात यजमान इंग्लंड संघाचा 157 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 210 धावांत आटोपला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचा नजराणा पेश केला. ऐतिहासिक विजयात उमेश यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. दरम्यान, उभय संघातील पाचवा आणि अखेरच्या कसोटी सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा - शेफाली वर्माचे टी-20 आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम

हेही वाचा - BCCI ने शेअर केला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.