ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : व्यवस्थापनाच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे केकेआरच्या कामगिरीचा आलेख घसरला का? - सीईओ वेंकी मैसूर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 52 धावांच्या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या वक्तव्यामुळे व्यवस्थापनाच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे कामगिरीचा आलेख घसरला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

KKR
KKR
author img

By

Published : May 10, 2022, 7:15 PM IST

नवी दिल्ली: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 56 व्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी विजय ( KKR won by 52 runs ) मिळवला. त्यामुळे केकेआरच्यआ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत. या विजयानंतर संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संघ ( Captain Shreyas Iyer ) निवडीवर मोठा खुलासा केला. त्यामुळे व्यवस्थापनाच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे कामगिरीचा आलेख घसरला का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आतापर्यंत केकेआर संघात 12 सामन्यांमध्ये 20 खेळाडूंना संधी देण्यात आली असून एकही सामना एकाच इलेव्हनमध्ये ठेवण्यात आलेला नाही. यामुळे संघात स्थिरता आली नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर अय्यरला संघात वारंवार होणाऱ्या बदलांवर खेळाडूंची काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला, खूप अवघड आहे. संघ निवडीत प्रशिक्षक आणि काहीवेळा सीईओ यांचाही सहभाग असतो. प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.

व्यवस्थापन अनेक मुद्द्यांवर एकमत नाही ( Management not agree on many issues ), त्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असताना अय्यरच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले. पण केकेआरमध्ये याच्या उलट आहे. याचे कारण संघ निवडीबाबतचे चुकीचे निर्णय आहेत आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही पाच सामन्यांत जगातील अव्वल क्रमांकाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कसे डावलले गेले असा सवाल केला आहे.

सीईओ वेंकी मैसूर ( CEO Venki Mysore ) यांनी संघ निवडीच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या हस्तक्षेपाबाबत प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. पण केकेआर व्यवस्थापनाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, अय्यरच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.

मैसूरचा बचाव करताना सूत्राने सांगितले ( Defending Mysore the source said ) की, “विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. वेंकी संघ निवडीत हस्तक्षेप करतो असे मला वाटत नाही. तो कर्णधार आणि प्रशिक्षकाचा अधिकार आहे. काही वेळा सीईओंचे मत मागवले जाते आणि त्यांनी काही सूचना दिल्या असतील. एका सूत्राने सांगितले की, "केकेआरच्या कोचिंग स्टाफमध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम, डेव्हिड हसी आणि अभिषेक नायर यांचा समावेश आहे. अभिषेक केकेआर अकादमीचा प्रभारी असेल, पण संघ रचनेत त्याची मोठी भूमिका आहे.

हेही वाचा - Ipl 2022 Gt Vs Lsg : प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी लखनौ आणि गुजरात आमने सामने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.