चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former Indian Cricket Team Captain Dhoni ) याने मॅच फिक्सिंग प्रकरणात ( Dhoni Reaches High Court to Take Contempt ) सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी ( IPS Officer G Sampath Kumar Statements Against Supreme Court ) आयपीएस अधिकारी जी संपत कुमार यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे. समन्स जारी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. परंतु, आज त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.
धोनीने 2014 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांच्या विरोधात दिवाणी दावा दाखल : धोनीने 2014 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगशी संबंधित कोणतेही विधान करण्यापासून रोखण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला होता. 100 कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने 18 मार्च 2014 रोजी संपत कुमार यांना धोनीविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखणारा अंतरिम आदेश दिला होता. असे असूनही, संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्या विरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली आहे.
-
MS Dhoni moves Madras HC seeking criminal contempt proceedings against IPS officer Sampath Kumar
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/Gd0nXLPd0W#MSDhoni #MadrasHighCourt #IndianCricketer #IPL pic.twitter.com/e25PLN4HnY
">MS Dhoni moves Madras HC seeking criminal contempt proceedings against IPS officer Sampath Kumar
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/Gd0nXLPd0W#MSDhoni #MadrasHighCourt #IndianCricketer #IPL pic.twitter.com/e25PLN4HnYMS Dhoni moves Madras HC seeking criminal contempt proceedings against IPS officer Sampath Kumar
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/Gd0nXLPd0W#MSDhoni #MadrasHighCourt #IndianCricketer #IPL pic.twitter.com/e25PLN4HnY