ETV Bharat / sports

IPL 2022 DC vs PBKS : बीसीसीआयचा मोठा निर्णय; 'या' ठिकाणी होणार पंजाब दिल्लीचा सामना - IPL

दिल्ली कॅपिटल्सच्या पथकातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये होणाऱ्या सामन्याचे स्थळ बदलले आहे. हा सामना बुधवारी (20 एप्रिल) होणार आहे.

DC vs PBKS
DC vs PBKS
author img

By

Published : Apr 19, 2022, 5:23 PM IST

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (20 एप्रिल) होणार आहे. तत्पुर्वी या सामन्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने या सामन्याचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता, मात्र आता तो मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ( Mumbai's Brabourne Stadium ) होणार आहे.

  • UPDATE:
    The #DCvPBKS match scheduled for tomorrow, 20th April, has been shifted to the Brabourne Stadium, Mumbai from MCA Stadium, Pune in light of the recent COVID-19 cases in the camp.

    The entire contingent will undergo another round of RT-PCR testing on Wednesday morning. pic.twitter.com/EgZojafHLQ

    — Delhi Capitals (@DelhiCapitals) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals ) कॅम्पमध्ये कोविडची प्रकरणे पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच प्रवासादरम्यानचा धोका कमी करण्यासाठी सामन्याचे ठिकाणच बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सामन्यच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद वातावरणात लांब पल्ल्याच्या बस प्रवासादरम्यान कोणतीही अनोळखी प्रकरण घडू नये म्हणून सामना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या पथकातील पॉझिटिव्ह आलेले सदस्यांमध्ये फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट ( Patrick Farhart ), स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, खेळाडू मिचेल मार्श ( Mitchell Marsh ), टीम डॉक्टर अभिजीत साळवी आणि सोशल मीडिया कंटेंट टीम सदस्य आकाश माने यांचा समावेश आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे आणि सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची चाचणी केली जाईल. तसेच त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बायो-बबलमध्ये परतण्याची परवानगी दिली जाईल.

19 एप्रिलच्या दुपारपर्यंत, मिचेल मार्श आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफच्या चार सदस्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी सकाळी झालेल्या RT-PCR चाचण्यांच्या चौथ्या फेरीचे निगेटिव्ह निकाल आले आहेत. एकाकी राहणाऱ्या या सर्व सदस्यांची सामन्याच्या सकाळी पुन्हा एकदा चाचणी घेतली जाईल.

हेही वाचा - IPL 2022 LSG v RCB : लखनौच्या सुपर जायंट्सला आज बंगळुरूचे रॉयल चॅलेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.