ETV Bharat / sports

IPL 2022 LSG vs DC : सलग दुसऱ्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सला तिसरा झटका; ऋषभ पंतला 'या' कारणासाठी ठोठावण्यात आला दंड - Rishabh Pant

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी ( Slow over rate ) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant
author img

By

Published : Apr 8, 2022, 3:07 PM IST

मुंबई: गुरुवारी (7 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants Vs Delhi Capitals ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना पार पडला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनौ संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव ( Lucknow Super Giants won by 6 wkts )केला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक मोठा धक्का ( Big blow to Delhi Capitals ) बसला आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ( Lucknow Super Giants ) सामन्यात त्यांच्या संघाने षटकांची गती संथ राखल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, "या हंगामातील संघाचे हे पहिले उल्लंघन होते, त्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला ( Captain Rishabh Pant fined ) षटकांची गती संथ ( Slow over rate ) राखल्याच्या उल्लंघनासाठी आयपीएल आचारसंहितेनुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता."

दिल्ली कॅपिटल्सला गुरुवारी येथे लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. चालू मोसमातील तीन सामन्यांमधला त्यांचा हा दुसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 149 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून लखनौ सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉकच्या ( Quinton de Kock ) 52 चेंडूत 80 धावांच्या खेळीच्या जोरावर हे लक्ष्य सहज गाठले.

हेही वाचा - LSG vs DC 2022 : विजयाची हॅट्रीक ! लखनऊकडून दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.