हरारे - झिम्बाब्वे आणि पाकिस्तान या संघात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. शुक्रवारी उभय संघातील दुसरा सामना पार पडला. हा सामना झिम्बाब्वेने जिंकला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजाने फेकलेल्या बाऊंसरने झिम्बाब्वेच्या फलंदाजाच्या डोक्यावरील हेल्मेटचे दोन अक्षरश: दोन तुकडे झाले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा २० वर्षीय गोलंदाज अर्षद इक्बालने डावातील दुसरे षटक फेकला. या षटकात त्याने झिम्बाब्वेचा फलंदाज तिनाशे कमुनुकम्वेला बाऊंसर फेकला. हा बाऊंसर कमुनुकम्वेच्या थेट हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे हेल्मेट तसेच राहिले आणि त्याच्या वरील भाग निघून मैदानात खाली पडला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला, पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी लगेच कमुनुकम्वेकडे धाव घेत, तो जखमी तर झाला नाही ना, याची पाहणी केली.
-
Those dreadlocks surely saved Kamunhukamwe from potential concussion after getting hit by an Arshad Iqbal bouncer 😂 #ZIMvPAK @ZimCricketv #VisitZimbabwe pic.twitter.com/3n6oxjVn8K
— Kudakwashe (@kudaville) April 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Those dreadlocks surely saved Kamunhukamwe from potential concussion after getting hit by an Arshad Iqbal bouncer 😂 #ZIMvPAK @ZimCricketv #VisitZimbabwe pic.twitter.com/3n6oxjVn8K
— Kudakwashe (@kudaville) April 23, 2021Those dreadlocks surely saved Kamunhukamwe from potential concussion after getting hit by an Arshad Iqbal bouncer 😂 #ZIMvPAK @ZimCricketv #VisitZimbabwe pic.twitter.com/3n6oxjVn8K
— Kudakwashe (@kudaville) April 23, 2021
हेल्मेटचे दोन तुकडे झालेले पाहून झिम्बाब्वे संघाचे वैद्यकीय कर्मचारी ताबडतोब मैदानात धावत आले आणि त्यांनी कमुनुकम्वेची पाहणी केली. मात्र कमुनुकम्वेला सुदैवाने दुखापत झाली नसल्याने तो थोडक्यात बचावला. पण, या घटनेने अजिबात विचलित न होता कमुनुकम्वेने आपला खेळ सुरू ठेवत संघासाठी सर्वाधिक ३४ धावा केल्या.
दरम्यान, वेगवान गोलंदाज ल्यूक जोंगवे (१८ धावांत ४ बळी) आणि लेगस्पिनर रियल बर्ल (२१/२) यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने दुसर्या टी -२० सामन्यात पाकिस्तानवर १९ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पाकिस्तान विरुद्धचा त्यांचा पहिलाच विजय आहे. याअगोदर दोन्ही संघांदरम्यान १५ सामने खेळले गेले असून पाकिस्तानने सर्व सामने जिंकले आहेत.
हेही वाचा - IPL २०२१: राजस्थानचा आणखी एक 'स्टार' खेळाडू आयपीएलमधून बाहेर
हेही वाचा - KKR VS RR : राजस्थानने नाणेफेक जिंकली, केकेआरची फलंदाजी