नवी दिल्ली : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल विवाहबंधनात अडकला आहे. अक्षर पटेलचा त्याची साथीदार मेहा सोबत गुरुवारी (२६ जानेवारी) रोजी गुजरातमधील वडोदरा येथे विवाहसोहळा पार पडला. आता अक्षरच्या लग्नाचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्याच्या लग्नाची बातमी फक्त काही खास लोकांनाच माहीत होती. अक्षर आणि मेहाच्या मेंदी आणि हळदीचा विधीही पार पडला.
-
Happy married life Axar Patel 💞👩❤️👨#AxarPatel #MehaPatel #WeddingNight #WeddingDay pic.twitter.com/priqlc2R6k
— Meha Patel (@Meha_Patela) January 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy married life Axar Patel 💞👩❤️👨#AxarPatel #MehaPatel #WeddingNight #WeddingDay pic.twitter.com/priqlc2R6k
— Meha Patel (@Meha_Patela) January 26, 2023Happy married life Axar Patel 💞👩❤️👨#AxarPatel #MehaPatel #WeddingNight #WeddingDay pic.twitter.com/priqlc2R6k
— Meha Patel (@Meha_Patela) January 26, 2023
अक्षर-मेहाचा जबरदस्त डान्स : संगीत सेरेमनीमध्ये अक्षर पटेलने मेहासोबत जबरदस्त डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि चाहत्यांना देखील तो आवडतो आहे. अक्षर आणि मेहाच्या हळदीच्या फोटोलाही लोक पसंती देत आहेत. अक्षर आणि मेहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षीच दोघांची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट सोहळ्याला फक्त खास पाहुणेच आले होते.
कोण आहे मेहा पटेल : मेहा पटेल ही न्यूट्रिशियनिस्ट आहे. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅन्स सांगून लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम करते. अक्षर पटेल आणि मेहा अनेकदा एकत्र दिसले आहेत. नुकतेच ते दोघेही अमेरिकेला गेले होते. अक्षर पटेलने वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती.
क्रिकेटर जयदेव उनाडकट लग्नात पोहचला : अक्षर आणि मेहाच्या लग्नात क्रिकेटर जयदेव उनाडकट पत्नी रिनीसोबत पोहोचला होता. अक्षरच्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रिनी आणि जयदेव यांनी अक्षर आणि मेहासोबत छायाचित्रेही काढली. जयदेवने दोन वर्षांपूर्वी रिनीशी लग्न केले होते. दोघांचे लग्न गुजरातमधील आनंद येथे झाले होते. रिनी व्यवसायाने वकील आहे. अक्षर-मेहाच्या लग्नात दोघांनी चांगलाच धुमाकूळ घातला.
अक्षरने 2014 मध्ये पदार्पण केले होते : अक्षर पटेलने 2014 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2021 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. अक्षरने या मालिकेत शानदार गोलंदाजी केली होती आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. अक्षरने भारतासाठी 8 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 8 कसोटीत 47 बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने वनडेमध्ये 56 आणि टी-20मध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरने आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय अर्धशतके झळकावली आहेत.