ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : 'हे' ५ सर्वात अनुभवी खेळाडू विश्वचषकात दाखवू शकतात दमदार कामगिरी - रविचंद्रन अश्विन

Cricket World Cup 2023 : २०२३ च्या विश्वचषकात अनेक वयस्कर खेळाडू मैदानावर खेळताना दिसतील. या खेळाडूंनी आपला फिटनेस कायम राखत टीममध्ये स्थान मिळवलंय. या विश्वचषकात खेळणाऱ्या टॉप ५ सर्वात अनुभवी खेळाडूंमध्ये एका भारतीय खेळाडूचाही समावेश आहे. कोण आहेत हे खेळाडू, जाणून घ्या..

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 2:31 PM IST

मुंबई Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यासाठी आता अवघे तीन दिवस उरले आहेत. ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होईल. यंदाच्या विश्वचषकात तरुण खेळाडूंसोबतच अनेक अनुभवी खेळाडूही आपले कौशल्य दाखवताना दिसणार आहे. आता आम्ही तुम्हाला या विश्वचषकात खेळणाऱ्या पाच सर्वात अनुभवी खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याकडे त्यांच्या अनुभवाच्या बळावर कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे.

  1. वेस्ली बॅरेसी : नेदरलँडचा फलंदाज वेस्ली बॅरेसी हा क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याच वय ३९ वर्षे १५२ दिवस आहे. वेस्लीनं २०१० मध्ये स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वेस्लीनं आतापर्यंत ४५ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यानं ४४ डावांमध्ये ३०.५८ च्या सरासरीनं १,१९३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं एक शतक आणि आठ अर्धशतकं झळकावली. वेस्लीचा स्ट्राइक रेट ७८.४८ आहे. १३७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
    Cricket World Cup 2023
    वेस्ली बॅरेसी
  2. रोएलॉफ इरास्मस व्हॅन डेर मर्वे : नेदरलँडचा डावखुरा फिरकीपटू रोएलॉफ इरास्मस व्हॅन डेर मर्वे हा क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये खेळणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. मर्वे ३८ वर्षे २५७ दिवसांचा आहे. मर्वे सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता. मात्र त्यानंतर त्यानं नेदरलँड्सकडून खेळायला सुरुवात केली. त्यानं २०१९ मध्ये नेदरलँड्सकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मर्वेने आतापर्यंत १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९ बळी घेतले आहेत. मर्वे अतिशय किफायतशीर गोलंदाजी करतो. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ४.९८ आहे. मर्वेची गोलंदाजीची सरासरी ३६.०५ आहे.
    Cricket World Cup 2023
    रोएलॉफ इरास्मस व्हॅन डेर मर्वे
  3. मोहम्मद नबी : अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू मोहम्मद नबी या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचं वय ३८ वर्ष २७० दिवस आहे. त्यानं २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानसाठी पदार्पण केलं. नबीनं १४७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी त्याला १३१ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. यामध्ये त्यानं २७.१८ च्या सरासरीनं ३,१५३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे एक शतक आणि १६ अर्धशतकं आहेत. यासह नबी त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. नबीनं आतापर्यंत १५४ विकेट घेतल्या आहेत. ३० धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ४.२९ एवढा आहे.
    Cricket World Cup 2023
    मोहम्मद नबी
  4. महमुदुल्लाह : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमुदुल्लाह हा यंदाच्या विश्वचषकातील चौथा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्याचं वय ३७ वर्ष २४० दिवस आहे. महमुदुल्लाहनं २२१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला १९२ सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. महमुदुल्लाहनं ३५.३५ च्या सरासरीनं ५,०२० धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. १५० ही महमुदुल्लाहची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासह महमुदुल्लाहनं १४८ सामन्यात ५.२१ च्या इकॉनॉमीसह ८२ विकेट्स घेतल्या आहेत. ४ धावांत ३ बळी ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
    Cricket World Cup 2023
    मोहम्मद नबी
  5. रविचंद्रन अश्विन : हा विश्वचषक खेळणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूंच्या यादीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचं नाव पाचव्या क्रमांकावर आहे. जखमी अक्सर पटेलच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं. अश्विननं ११५ वनडेत १५५ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ४.९४ आहे. २५ धावांत ४ बळी ही अश्विनची सर्वोत्तम कामगिरी आहे. जर आपण त्याच्या फलंदाजीबद्दल बोललो तर त्यानं ६३ डावात ७०७ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ६५ आहे.
    Cricket World Cup 2023
    रविचंद्रन अश्विन

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : यावर्षी तरी न्यूझीलंड विश्वचषक जिंकणार का? 'या' पाच खेळाडूंवर असेल विजय मिळवून देण्याची जबाबदारी
  2. Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचे पाच मॅचविनर खेळाडू 'या' विश्वचषकात करू शकतात दमदार कामगिरी
  3. Cricket World Cup 2023 : बांग्लादेशच्या 'या' ५ खेळाडूंना अजिबात हलक्यात घेऊ नका, जाणून घ्या कोण आहेत हे खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.