ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडचा ९९ धावांनी दणदणीत विजय, मिचेल सँटनरचे ५ बळी - क्रिकेट विश्वचषक 2023

Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं नेदरलॅंडचा ९९ धावांनी दारूण पराभव केला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरनं ५९ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.

Cricket World Cup २०२३
Cricket World Cup २०२३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 3:01 PM IST

Updated : Oct 9, 2023, 9:49 PM IST

हैदराबाद : क्रिकेट विश्वचषकाच्या ६ व्या सामन्यात आज न्यूझीलंड समोर नेदरलॅंडचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नेदरलॅंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं ५० षटकांत ३२२-७ धावा केल्य. न्यूझीलंडकडून विल यंगनं ८० चेंडूत सर्वाधिक ७० धावा केल्या. रचिन रवींद्रनं ५१ तर कर्णधार टॉम लॅथमनं ४६ चेंडूत ५३ धावा ठोकल्या. नेदरलॅंडकडून आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वेनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

मिचेल सँटनरची धारदार गोलंदाजी : प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ ४६.४ षटकांत सर्वबाद २२३ धावाचं करू शकला. नेदरलॅंडकडून कॉलिन अकरमननं ७३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीनं सर्वाधिक ६९ धावा केल्या. कर्णधार एडवर्ड्सनं ३० तर एंजेलब्रेक्टनं २९ धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरनं धारदार गोलंदाजी केली. त्यानं १० षटकांत ५९ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.

विल यंगचं अर्धशतक : प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ४० चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. त्याला व्हॅन डर मर्वेनं बास डी लीडच्या हाती झेलबाद केलं. एका बाजूनं विल यंगनं चांगली फलंदाज केली. तो ८० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ७० धावा करून बाद झाला. व्हॅन मीकरेननं त्याची विकेट घेतली. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्रनं पुन्हा एकदा अर्धशतकीय खेळी केली. त्याला ५१ च्या स्कोरवर व्हॅन डर मर्वेनं झेलबाद केलं.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

नेदरलँड्स : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीड, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

स्कॉट एडवर्ड्स : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. शेवटच्या सामन्यापासून असं दिसतं की इथे गोलंदाजीची स्थिती चांगली असेल. रात्री दवाचा प्रभाव असणार नाही. आम्ही उत्तम स्थितीत आहोत. आमच्या संघात दोन बदल आहेत. सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि रायन क्लेन टीममध्ये आले आहेत.

टॉम लॅथम : आम्ही पण आधी गोलंदाजीचं केली असती. ही खेळपट्टी चांगली दिसते. आम्ही गेल्या आठवड्यात या विकेटवर खेळलेल्या सराव सामन्यात चांगल्या धावा बनवल्या होत्या. शेवटच्या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला. आधी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. नंतर डेव्हॉन आणि रचिन यांनी येऊन शानदार खेळ केला. जेम्स नीशमच्या जागी लॉकी फर्ग्युसन टीममध्ये आलाय.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाची रणनीती यशस्वी, भारतीय फिरकी त्रिकुटासमोर कांगारूंनी टेकले गुडघे
  2. ICC ODI World Cup 2023 India Vs Australia : कोहली-राहुलनं लाज राखली, भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय
  3. Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स

Last Updated : Oct 9, 2023, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.