ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : नेदरलँडचे 'हे' पाच खेळाडू बदलू शकतात विश्वचषक सामन्याची दिशा; जाणून घ्या... - FIVE PROMINENT NETHERLANDS PLAYERS

Cricket World Cup २०२३ : विश्वचषक २०२३ स्पर्धेत नेदरलँडचे पाच खेळाडू सामन्याची दिशा बदलण्याची कामगिरी करू शकतात. या खेळाडूंनी या अगोदरच्या सामन्यांमध्ये आश्चर्यकारक गोंलदाजीसह फलंदाजी केलीय. त्याच पाच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहेत....

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 4:11 PM IST

हैदराबाद : Cricket World Cup २०२३ : नेदरलँड्स क्रिकेट संघ विश्वचषकामध्ये खेळणार असून, त्यामुळं विरोधी संघाला चांगली तयारी करावी लागणार आहे. नेदरलँड्सनं झिम्बाब्वे येथे आयोजित विश्वचषक 2023 पात्रता स्पर्धा जिंकून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला आहे. आता खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. नेदरलँड्स संघात असे अनेक खेळाडू आहेत जे गोलंदाजीसह फलंदाजीत अप्रतिम कामगिरी करू शकतात. पण आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे विश्वचषकात सामन्याची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरू शकतात.

1. मॅक्स ओ'डॉड : नेदरलॅंडच्या खेळाडूमध्ये पहिल्या क्रमांकावर नाव येत ते म्हणजे मॅक्स ओ'डॉडचं. त्याच्याकडून नेदरलॅंड संघाला खूप अपेतक्षा आहेत. तसंच मॅक्सला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. मॅक्सनं आतापर्यंत 33 वनडेत 37.35 च्या सरासरीनं, 73.99 च्या स्ट्राइक रेटसह धावा केल्या आहेत. त्यानं 10 अर्धशतकांसह 1 हजार 158 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ९५ धावा आहे.

2. स्कॉट एडवर्ड्स : नेदरलँड संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. कर्णधारपदासोबतच फलंदाजीनं नेदरलॅंड संघाची जबाबदारी त्याच्यावर आहे. एडवर्ड्सनं आतापर्यंत 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40.40 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 92.73 असा आहे. एडवर्ड्सनं 13 अर्धशतकांसह 1 हजार 212 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 86 आहे.

3. तेजा निदामनुरु : नेदरलँड्सला या विश्वचषकात तेजा निदामनुरुकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तेजानं आतापर्यंत 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.5 च्या सरासरीनं आणि 95.1 च्या स्ट्राइक रेटसह 511 धावा केल्या आहेत. विश्वचषक पात्रता स्पर्धेत, त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 76 चेंडूत 111 धावांची खेळी खेळली होती.

4. बेस डी लीडे : बेस डी लीडे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. आतापर्यंत त्यानं 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक, 2 अर्धशतकांसह 27.32 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्याचा 66.57 चा स्ट्राइक रेटसह 765 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 123 आहे. गोलंदाजीत, बेसनं 5.94 च्या इकॉनॉमीसह 24 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 52 धावांत त्यानं 5 विकेट्स मिळवल्या आहेत.

5. रोएलॉफ व्हॅन डर मर्वे : नेदरलँड्सचा डावखुरा फिरकीपटू गोलंदाज रोएलॉफ व्हॅन डर मर्वे भारतीय खेळपट्ट्यांवर धोकादायक ठरू शकतो. त्याच्या गोलंदाजीनं फलंदाजांना घाम फुटण्याची शक्यता आहे. मर्वेनं 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.98 च्या इकॉनॉमीसह 36.5 च्या गोलंदाजीच्या सरासरीनं 19 बळी घेतले आहेत. मर्वेनंही 1 अर्धशतकासह 96 धावा केल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : एकेकाळी 'यांनी' केलं होतं जागतिक क्रिकेटवर राज्य, वाचा क्रिकेटच्या पडझडीची कॅरेबियन कथा
  2. Cricket World Cup 2023 : रवींद्र जडेजाला बालपणी बनायचं होतं वेगवान गोलंदाज, कोच महेंद्रसिंह चौहान यांचा 'ईटीव्ही भारत' च्या खास मुलाखतीत खुलासा
  3. Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचे पाच मॅचविनर खेळाडू 'या' विश्वचषकात करू शकतात दमदार कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.