लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माने शतकांचाही धडाका लावला. रोहित शर्माने बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात खेळताना ९२ चेंडूत ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. त्याचे हे स्पर्धेतील चौथे शतक ठरले. या शतकानंतर भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगने त्याचे ट्विटरवर कौतुक केले. त्यावर इंग्लंडचा माजी फलंदाज केवीन पीटरसनने त्याला खोचक प्रतिक्रिया दिली. आता त्यावर परत एकदा युवीने पीटरसनला सडेतोड उत्तर दिले आहे.
युवीने ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'आणि यासह रोहित आयसीसी मॅन ऑफ द टूर्नामेंट ट्रॉफीच्या अजून जवळ पोहोचला आहे. हिटमॅन तू शानदार आहेस, स्पर्धेतील चौथे शतक, खूप चांगला खेळलास चॅम्पियन'. त्यावर पीटरसनने त्याला खोचक प्रतिक्रिया देत म्हटले आहे, 'इंग्लंड ने विश्वकप जिंकला तर नाही, पाय-चकर'.
![yuvraj singh epic reply to kevin pietersen on world cup win england](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3729768_dd.jpg)
यावर युवीने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तो म्हणाला, ' आधी उपांत्य फेरी गाठा नंतर जिंकण्याच्या गोष्टी करा. आणि मी मॅन ऑफ द सीरिजबद्दल बोलत होतो, विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्याबद्दल नाही!'