चेस्टर ली - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या निश्चितीसाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ रिव्हरसाईड ग्राऊंडवर उभे ठाकणार आहेत. भारताला हरवून आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडला आज विजय मिळवता आला नाही तर, पाकिस्तानचा संघ बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठू शकेल.
आज रंगणारा हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल. इंग्लंडने मागच्या सामन्यात भारताविरुद्ध फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार प्रदर्शन केले होते. तर, गतउपविजेत्या न्यूझीलंड संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव झाला होता. संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार केन विल्यमसनवर असेल तर गोलंदाजीचा ताफा हॅट्ट्रिकवीर ट्रेंट बोल्ट सांभाळेल. त्यामुळे न्यूझीलंड संघ परत एकदा विजयी रुळावर आरुढ होण्यास उत्सुक असेल.
दोन्ही संघ -
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.
- इंग्लंड - ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.