बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकने आफ्रिकेला हरवत स्पर्धेतले आपले आव्हान जिवंत ठेवले असले तरी, आज त्यांना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर बलाढ्य न्यूझीलंडशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे आजचा आणि बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यावरही त्यांना जर- तरच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. पाकिस्तानने ६ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. आजचा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
दुसऱ्या बाजूला स्पर्धेत अपराजित राहिलेला न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मागील लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला होता. पण, या सामन्यात षटकांची कमी गती राहिल्यामुळे न्यूझीलंडला दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे परत अशी चूक झाल्यास जबरदस्त फॉर्मात असलेल्या कर्णधार केन विल्यमसनवर एका सामन्याची बंदी येऊ शकते.
दोन्ही संघ -
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर, ईश सोधी, टीम साऊदी, टॉम ब्लंडेल.
- पाकिस्तान - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.