बर्मिंगहॅम - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून ट्विटरद्वारे करण्यात आले होते आणि आता कर्णधार विराट कोहली, धोनी, चहल आणि हार्दिक पांड्या यांचे या जर्सीतील फोटो आयसीसीने शेअर केले आहेत.
-
What do you think of this kit? 💥 #TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/Bv5KSfB7Uz
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What do you think of this kit? 💥 #TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/Bv5KSfB7Uz
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 2019What do you think of this kit? 💥 #TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/Bv5KSfB7Uz
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 29, 2019
या नव्या जर्सीत हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लडविरूद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.

आयसीसीच्या नियामानुसार यजमान संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागत नाही. त्यामुळे इंग्लडच्या जर्सीत कोणताच बदल होणार नाहीय. आयसीसीने हा निर्णय फुटबॉलवरून प्रेरित होऊन घेतला आहे.