लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानला दोन्ही सामन्यात जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी संघाने केलेल्या झुंजार कामगिरीचे क्रिकेटविश्वात सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. विश्वकरंडकात राहिलेल्या सामन्यांतही अशाच कामगिरीची अफगाणिस्तानच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र, अफगाणिस्तान संघाला एका मोठा धक्का लागला आहे.
अफगाणिस्ताचा स्फोटक आणि सलामीचा फलंदाज मोहम्मद शहजाद विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो उरलेल्या सर्व सामन्यांना तो मुकणार आहे.

यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादच्या जागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश केला आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला विकेट्सने हरवत आपले इरादे स्पष्ट केले होते.
विश्वकरंडकात उद्या अफगाणिस्तान संघाची गाठ न्यूझीलंडबरोबर असेल.