लंडन - उपांत्य फेरीचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशचा ९४ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकने विजय मिळवला असला तरी नेट रनरेटचे गणित सोडवण्यात त्यांना अपयश आले. या सामन्यात एक मजेशीर गोष्ट घडली. पाकिस्तान संघ गोलंदाजी करत असताना फिरकीपटू मोहम्मद हाफिजने एक चेंडू टाकला. पण तो त्याच्या हातातून निसटला आणि थेट अंतराळात गेला.
खरे सांगायचे झाले तर, आयसीसीने हाफिजचा हा चेंडू अंतराळात पोहोचवण्याचे काम केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हाफिजने हा चेंडू टाकला होता. आणि या चेंडूवर बांगलादेशच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला होता. आयसीसीने हाफिजच्या या चेंडूला गमतीशीर पद्धतीने बनवले आहे.
-
When your bowling coach tells you to "give it some flight" 😂@MHafeez22 🙈 #CWC19 pic.twitter.com/85QDLoaLCb
— ICC (@ICC) July 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When your bowling coach tells you to "give it some flight" 😂@MHafeez22 🙈 #CWC19 pic.twitter.com/85QDLoaLCb
— ICC (@ICC) July 5, 2019When your bowling coach tells you to "give it some flight" 😂@MHafeez22 🙈 #CWC19 pic.twitter.com/85QDLoaLCb
— ICC (@ICC) July 5, 2019
या सामन्यात पाकच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शाकिबने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. पण दुसऱया बाजूने त्याला कोणाची साथ लाभली नाही. तेज गोलंदाज शाहीन आफ्रिदीने बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला.