दुबई - आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताच्या लोकेश राहुलने दुसरे स्थान राखले आहे. न्यूझीलंड दौऱ्यावरील शानदार कामगिरीचा फायदा राहुलला झाला असून त्याच्या खात्यात ८२३ गुण जमा आहेत. या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम ८७९ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचा - एक पाऊल विश्वकरंडक विजयाकडे; भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल
गोलंदाजांमध्ये फिरकीपटू अॅस्टन अगरने या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात हॅटट्रिकसह पाच बळी घेणारा अगर सहा स्थानांची झेप घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अगरचा सहकारी अॅडम झाम्पा तिसऱया तर, दक्षिण आफ्रिकेचा तबरेस शम्सी पाचव्या स्थानी आहे.
टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहलीही ६७३ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर २६ वरून १८व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी स्टीव्ह स्मिथ २६५ व्या स्थानावरुन ५३ व्या स्थानावर आला आहे.