नवी दिल्ली - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. खराब कामगिरीमुळे पाकला पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय, चाहत्यांचा रोषही ओढून घ्यावा लागला. पाकचे फलंदाज फखर जमान, बाबर आझम आणि इमाद वसिम वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामध्ये फलंदाज बाबर आझमने ३ चौकार आणि एका षटकारासह ४८ धावांची खेळी केली होती. यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत फलंदाजी करताना बाबरने उत्कृष्ट फटके खेळले आहेत आणि त्या फटक्यांची आयसीसीलाही भूरळ पडली आहे.
-
Babar Azam doing Babar Azam things on loop for two minutes 😍 #CWC19 | #WeHaveWeWill pic.twitter.com/RoBVSJioGw
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Babar Azam doing Babar Azam things on loop for two minutes 😍 #CWC19 | #WeHaveWeWill pic.twitter.com/RoBVSJioGw
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 18, 2019Babar Azam doing Babar Azam things on loop for two minutes 😍 #CWC19 | #WeHaveWeWill pic.twitter.com/RoBVSJioGw
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 18, 2019
आयसीसीने बाबर आझमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत बाबरने यंदाच्या विश्वचषकात खेळलेल्या सुंदर फटक्यांचा समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बाबरने कव्हर ड्राइव, स्ट्रेट ड्राइव, स्क्वेअर कट हे फटके मारले आहे.
बाबर आझम हा पाकिस्तानचा सध्याच्या घडीचा आघाडीचा फलंदाज आहे. २४ वर्षीय बाबर हा आयसीसीच्या जागतिक टी-२० क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे.